Type Here to Get Search Results !

दादर सागरी पोलिस ठाणे हद्दीत पाच लाख रुपये किंमत असलेल्या मांडुळ सापांच्या विक्रीचा प्रयत्न


• दादर सागरी पोलिस ठाणे हद्दीत पाच लाख रुपये किंमत असलेल्या मांडुळ सापांच्या विक्रीचा प्रयत्न 


 रायगड वेध प्रशांत पोतदार पेण


मिळालेल्या माहिती नुसार,दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडुळ साप विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती त्यानूसार ता.२५ रोजी मुंबई गोवा महामार्गावर जिते गावाजवळ जय अंबे हॉटेल येथे ५ आरोपी यांनी हंडाई असेट कार ( नंबर एम एच ४७ एन ६०००) मध्ये सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे (३)मांडुळ साप प्रजातीचे वन्य जीव विक्रीसाठी आणले होते. आरोपींना पोलीसांकडून अटक करण्यात येत असताना पोलिसांना धक्का बुक्की करून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाच ही आरोपींना पकडुन अटक केली आहे.

याबाबत दादर सागरी पोलीस ठाणे येथे वन्य जीव संरक्षण अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक गोविंदराव पाटील हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test