Type Here to Get Search Results !

फुलांच्या किंमतीत वाढ झाल्याने हार तुरे बुके महागली • पेण शहरात १०ते५०रूपये वाढीव दराने विक्री


• फुलांच्या किंमतीत वाढ झाल्याने हार तुरे बुके महागली 

• पेण शहरात १० ते ५० रूपये वाढीव दराने विक्री


रायगड वेध प्रशांत पोतदार पेण


अवेळी पडणारा पाऊस आणि सतत बदलत असलेल्या वातावरणाचा फटका फुल पिकांना बसत असल्याने बाजारपेठेतील फुलांचे भाव कमी जास्त होताना दिसून येत आहे

कोरोना काळात लग्नसराई बंद असल्याने फुले व फुल साहित्य विक्रेत्यांच्या धंद्यावर ही परिणाम झाला तर यंदा पुन्हा वातावरणात बदल होत असल्याने फुल पिकांना याचा फटका बसत आहे.

देवपूजा,मंगल कार्यक्रम,सजावट या साठी लागणारी फुले साहित्य यांच्या किंमतीवर बाजारपेठेनुसार कमी जास्त प्रमाणात परिणाम होता असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे हार, तुरे, फुले, वेलकम बुके, वेण्या, गजरे, आदी फुल व साहित्यांच्या किंमती दहा ते पन्नास रुपयांनी महागली असल्याचे विक्रेते सांगत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test