Type Here to Get Search Results !

आझादी का अमृतोत्सव केंद्र शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीनेश्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात आयुष्मान मेळा संपन्न


• आझादी का अमृतोत्सव केंद्र शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात आयुष्मान मेळा संपन्न 


रायगड वेध अभय पाटील


उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे आझादी का अमृतोत्सव कार्यक्रम अंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून आयुष्मान मेळा चे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाला श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे होते.
 या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना तहसीलदार सचिन गोसावी म्हणाले की ,आयोजित केलेल्या आयुष्मान मेळ्यात सर्व आजारावरचे तज्ञ आज उपस्थित असून जास्तीत जास्त जनतेला या मेळ्याच्या माध्यमातुन फायदा व्हावा या हेतूने मेळ्याबाबत आधीच जनजागृती केलेली आहे. मेळ्याला उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभलेली असून लाभार्थ्यांनी घाई गडबड न करता आपल्या आरोग्याविषयी शंकांचे समाधान करून घ्यावे तसेच उपचार घ्यावे. मेळ्याला आलेल्या प्रत्येकाने आपल्या आरोग्याविषयी जागरूकता ठेवण्यासाठी लाभ घ्यावा असे सांगितले .या वेळी व्यासपीठावर डॉ मधुकर ढवळे डॉ. सूरज तडवी, डॉ महेंद्र भरणे, डॉ. सुभाष सिंग, डॉ. तुषार शेठ, डॉ प्रफुल्ल, डॉ अलंकार करंबे, डॉ डोईफोडे, डॉ सोनाली करंबे, डॉ. नाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानांवरून मार्गदर्शन करताना डॉ. ढवळे म्हणाले की ,शासनाच्या वतीने जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या आयुष्मान मेळ्याचे आयोजन केलेले आहे .आपले आरोग्य प्रत्येकाने जपले तर देश बलवान राहील असे सांगितले.

मेळ्यात कान, नाक, घसा, पोटाचे विकार, लहान मुलांचे आजार, मुतखडा, हाडांचे आजार ,स्त्रीयांचे आजार, डोळ्यांचे विकार, हृदय रोग, दातांचे विकार, किडनी आजार या विषयी तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात आले ,तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बाबत माहिती देण्यात आली या दोन्ही योजनेचे महत्व पटवून देण्यात आले व या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ कसा घ्यावा या बाबत मार्गदर्शन करण्यात आले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test