Type Here to Get Search Results !

पावसाळ्यापूर्वी बेगमीसाठी महिला वर्गाची लगबग


पावसाळ्यापूर्वी बेगमीसाठी महिला वर्गाची लगबग


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा 


अवघ्या दिड महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला असल्याने तळा बाजारपेठेत पावसाळ्यापूर्वी बेगमीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे.यासाठी तळा बाजारपेठेत बारीक सुकट,अंबाडी सुकट, बोंबील,वाकटी, म्हाकल्या आदी सुकी मच्छी खरेदी करताना महिला पहायला मिळतात.यांसह पावसाळ्यात लागणारे चवळी,वाल, मूग,मटकी,हरभरा ही कडधान्य देखील खरेदी केली जात आहेत.कोकणात विविध लज्जतदार पदार्थ आवडीने केले जातात.उन्हाळी अगोटीला गावागावांत पापड,फेण्या,शेवया,विविध प्रकारचे लोणचे,मसाले यांसारखे विविध वाळवणीचे पदार्थ सामूहिक व वयक्तिकपणे केले जातात.रायगड जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये वाळवण संस्कृती जोपासली जाते.गावागावांत आजही महिला पापड, फेण्या, शेवया, लोणची आदी पदार्थ तयार करण्यासाठी एकत्र जमतात. यानिमित्ताने महिलांच्या गप्पा रंगतात.व पदार्थ तयार करीत असताना गाणीही गायिली जातात. मात्र हे काम विनाशुल्क चालते.तसेच ज्या घरामध्ये हे पदार्थ बनविण्याचे काम चालू असते त्या घरातून या महिलांच्या चहा नाश्त्याची सोय करण्यात येते.पूर्वापार चालत आलेली बेगमी व वाळवणीची संस्कृती आजही कायम जपली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test