• तळा शहरात सर्व रोग निदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
तळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी तळा आयोजित शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र/गो. म.वेदक विद्यामंदिर तळा येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन सोमवार दि.१८ एप्रिल रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार ए.एम.कनशेट्टी,नगराध्यक्ष अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ९ ते दु.३ या वेळेत सदर शिबीर पार पडले.केंद्र सरकार च्या सुचनेनुसार आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबिर घेण्यात येत असून तळा तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीने तळा तालुका आरोग्य अधिकारी, एम् जी एम हाँस्पिटल कंळबोली, कामोठे, स्वदेश फाऊंडेशन लोणेरे माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्र तळा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबीर घेण्यात आले.या शिबिराचा तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील नागरिकांनी लाभ घेतला.सदर शिबिरात स्त्रीरोग ,नाक,कान,घसा,बालरोग,अस्थीरोग दंत चिकित्सक,मिषक याआजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली.