रायगड वेध कुणाल मोरे अलिबाग
उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की, मुंबईतील चाकरमानी वर्ग सहकुटुंबासह कोकणची वाट धरतात. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेवर विशेष गाड्या सोडल्या जातात. याच पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेळ वाचण्यासाठी, नवीन गाड्या सेवेत याव्या यासाठी कोकण रेल्वेने क्रॉसिंग स्थानक प्रकल्प राबविला होता. हा प्रकल्प मार्च अखेरीस पूर्ण झाल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत कोकण रेल्वेवर नव्या दहा स्थानकांची भर पडली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. कोकण रेल्वेवरून केवळ कोकणातच नाही तर, यामार्गे अनेक गाड्या गोवा व दक्षिणेकडील राज्यातील चेन्नई, कन्याकुमारी सारख्या विविध शहरांच्या दिशेने जातात. याशिवाय मालवाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. या नव्या क्रॉसिंग स्थानकांमुळे रेल्वेला आणि प्रवाशांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. या नव्या स्थानकांची यादी खालीलप्रमाणे आहेत.
इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामने, कळबनी, कडवई, वेरावली, खारेपाटण, आर्चिणे, मिरजन, इनजे अशी दहा क्रॉसिंग स्थानके सेवेत आली आहेत.