पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे जेष्ठ नागरिकाची मधमाशांच्या हल्ल्यातुन सुटका, पोलीस कॉन्स्टेबल जयवंत काठे यांच्या बहादुरीचे होतंय कौतुक
टिम रायगड वेध
रायगडमधील कर्जत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल जयवंत काठे यांनी दाखविलेल्या चतुराईने आणि प्रसंगावधानामुळे त्यांचे कौतुक होत आहे. भर रस्त्यात मधमाशांच्या हल्ल्यानंतर वृद्धाने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी काठेंनी बाईकच्या डिकीत असलेलं फडकं सॅनिटायझरच्या मदतीने पेटवलं. त्यानंतर मधमाशांच्या हल्ल्यातुन या जेष्ठ नागरिकाची सुटका झाली.
पोलीस स्टेशन समोरील रस्त्यातून जाणाऱ्या जेष्ठ नागरिकावर मधमाशांनी हल्ला केला. मदतीसाठी त्यांनी आवाज देताच पोलीस स्टेशनमध्ये असलेले पोलीस कॉन्स्टेबल जयवंत काठे धावत बाहेर गेले.
काठेंनी बाईकच्या डिकीत असलेलं फडकं आणि सॅनिटायझर यांच्या मदतीने आग पेटवली. जेष्ठ नागरिकाची या मधमाशांच्या हल्ल्यातुन सुटका केली. त्याला ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं