Type Here to Get Search Results !

वाळवटी येथे हनुमान जन्मोत्वस उत्साहात संपन्न


वाळवटी येथे हनुमान जन्मोत्वस उत्साहात संपन्न

रायगड वेध अभय पाटील

श्रोवर्धन तालुक्यामध्ये हनुमान जयंती उत्सव मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला. वाळवटी हनुमान दांडा विभागामध्ये प्रथमच हनुमान पालखी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. 
    वाळवटी, हनुमान दांडा येथील ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या विद्यमाने हनुमान जयंती उत्सवा निमित्त प्रथमच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, हनुमान जयंती उत्सवानिमित्त होणाऱ्या पालखी सोहळ्याचे नियोजन उदय मधूकर नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, दि. १५ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४.० वाजता सत्यनारायणाची महापुजा, रात्री ९.३० वाजता लहान मुलांचे सांस्क्रूतिक कार्यक्रम व १६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ६.२१ वा. हनुमान जन्मोत्सव, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५.०वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्या मध्ये सर्व लहान थोर मंडळी सहभागी झाले होते. माजी सैनिक तथा दिघी सागरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस नाईक व वाळवटी ग्रामस्थ प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या सहकार्याने पालखी तयार करून देण्यात आली होती, तर उसत्व समिती अध्यक्ष आशिष पुसालकर, उपाअध्यक्ष निलेश पेडणेकर, सचिव स्वप्नील नेवरेकर, खजिनदार रविंद्र बोरकर, सदस्य देवेंद्र पेडणेकर, किरण बोरकर तसेच सर्व सदस्य महिला मंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. 
           

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test