Type Here to Get Search Results !

तळा महावितरण विभागाची वीजबिल वसुली मोहीम, २४,७५,९८८ रुपये थकबाकी येणे बाकी


तळा महावितरण विभागाची वीजबिल वसुली मोहीम, २४,७५,९८८ रुपये थकबाकी येणे बाकी


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


 तळा तालुक्यात महावितरण विभागाने सध्या नागरिकांकडून थकीत वीजबिल वसुलीचा तगादा लावला आहे.ज्या नागरिकांचे वीजबिल बाकी आहे अशा नागरिकांकडून महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत वीजबिल वसुली करण्यात येत असून वेळेत वीजबिल न देणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन देखील तोडण्यात येत आहे.आधीच दररोजच भारनियमन व महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामहिन्यात वीज बीलासोबत अतिरिक्त ठेवी शुल्क देखील आकारण्यात आले आहे. तसेच ही सेक्युरिटी डिपॉझिट ची रक्कम भरली नाही तर ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा ईशाराही महावितरण विभागाकडून देण्यात आला आहे.

(तालुक्यातील २८० थकबाकीदार ग्राहकांची वीज कापली ) तळा तालुक्यातील वीजबिल थकबाकीदारांवर महावितरण विभागाकडून कारवाई करण्यात येत असून तालुक्यातील घरगुती,व्यावसायिक, कृषी व औद्योगिक अशा एकूण २८० थकबाकीदारांचे महावितरण विभागाने वीज कनेक्शन तोडून कारवाई केली आहे.

(महावितरण ची एकूण थकबाकी)
प्रकार                एकूण ग्राहक        थकबाकी

घरगुती:                २५१६             २०,४८,६८८
व्यावसायिक:         ७७                  २,३२,५४३
औद्योगिक:             २३                  ७५,५७४
कृषि:                     ७९                 १,१९,१८३

असे एकूण २४,७५,९८८. रुपये थकबाकी ग्राहकांकडून महावितरण विभागाला येणे आहे.


थकीत वीजबिल ग्राहकांकडे आमचे कर्मचारी वीजबिल वसुलीसाठी जातात.आम्ही दोन ते तीन वेळा त्यांना वीजबिल भरण्यासाठी सांगतो मात्र तरीही ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर संबंधित ग्राहकाला नोटीस बजावून त्याचे वीज कनेक्शन तोडण्यात येते

- के.डी. महिंद्रीकर उपकार्यकारी अभियंता तळा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test