Type Here to Get Search Results !

मनसे माथाडी कामगार चषक क्रिकेट स्पर्धेत साई रामनगर संघ विजेता


मनसे माथाडी कामगार चषक क्रिकेट स्पर्धेत साई रामनगर संघ विजेता 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना यांच्या वतीने येथील जोगेश्वरी नगर मधील मैदानावर दि. ८ व ९ एप्रिलला संपन्न झालेल्या मनसे माथाडी कामगार चषक २०२२ नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत साई रामनगर, नागोठणे संघाने विजेतेपद मिळविले. तर जय भवानी चिंचवली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 
देवालाई देवी, चिकणी व ओम सेवन स्टार कोळीवाडा यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविला. अंतिम सामन्यातील सामनावीर जीवन बेंडकुळे, मालिकाविर मनोज घरत, उत्कृष्ट फलंदाज महेंद्र अंधेरे, उत्कृष्ट गोलंदाज निखिल देवरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रीनंदन भिल्लारे यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

या स्पर्धेचे बक्षीस वितरण मनसे कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेश उज्जनकर, मनसे माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस राजन शितोळे मनसे कामगार सेना चिटणीस यशवंत हाडगे, माथाडी कामगार रायगड जिल्हा संघटक महेश पंडित, माथाडी कामगार सेना रायगड जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, मनसे वाहतूक सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुबोध जाधव, कल्याण शहर अध्यक्ष पंकज डोईफोडे व गणेश खंडारे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

जय हनुमान क्रिकेट क्लब आंगरआळी यांच्या आयोजनाखाली माथाडी कामगार सेना रोहा तालुका अध्यक्ष विनायक तेलंगे व माथाडी कामगार सेना विभाग अध्यक्ष नरेश भंडारी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उदघाटनाला दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेनकर माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, माणगांव तालुकाध्यक्ष प्रतीक रहाटे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार प्रल्हाद पारंगे, मनसे रोहा तालुका सचिव साईनाथ धुळे, माथाडी कामगार सेना तालुका उपाध्यक्ष गोरखनाथ पारंगे, रोहा तालुका महिला सेना सौ. दीपेश्री घासे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली व विविध माध्यमांनी सहकार्य केले. नरेश भंडारी यांनी स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test