Type Here to Get Search Results !

पोलादपूर येथे महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांच्याकडून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू


पोलादपूर येथे महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांच्याकडून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


        कोरोना नियमांमध्ये शिथिलता आल्याने शाळा महाविद्यालय पुन्हा सुरुवात करण्यात आले. परंतु मुलांना कोरोना विषाणू पासून धोका काही प्रमाणात कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व शाळा महाविद्यालये यांच्या पुढाकाराने लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.
     ‌‌ शनिवार दिनांक २३ एप्रिल रोजी लोहारे येथील साने गुरुजी विद्यालय येथे कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली १२ ते १४ वयोगटातील १३७ मुलांना पहिला डोस तसेच ६८ मुलांना दुसरा डोस देण्यात आला. शाळेतील मुख्याध्यापिका सुगंधा वाडवळ व सहाय्यक शिक्षक यांच्या पुढाकाराने लसीकरण मोहीम पार पडली. त्यामुळे पालक व शिक्षक यांची चिंता ही काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते.
        पोलादपूर तालुक्यातील आरोग्य अधिकारी कार्यालय व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य अधिकारी डॉक्टर दामोदर पवार, आशा सेविका सीमा साळुंखे, सहाय्यक कर्मचारी गौरव माने, साहिल पालकर आरोग्यसेविका श्रद्धा सोनकर, हे रुग्णवाहिकेच्या सहाय्याने पोलादपूर तालुक्यातील सुंदरराव मोरे महाविद्यालय विद्यामंदिर विद्यालय अशा अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये लसीकरण करत आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या माहितीनुसार लसीकरण ही जवळपास शंभर टक्के पूर्ण होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test