• नियम पाळून बैलगाड्या शर्यती सुरूच राहतील -
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरीशेठ फडके
• बैलगाड्या शर्तीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांच्या हस्ते गागोदे येथे लाला माती मैदानावर उदघाटन
• राज्यातुन शेकडो बैलगाड्यांचा सहभाग
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सात वर्षानंतर प्रथमच राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन तालुक्यातील गागोदे येथे लाला मातीच्या मैदानावर करण्यात आले होते. राज्यस्तरीय बैलगाड्यां शर्यती ग्रामस्थ मंडळ गागोदे यांच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून शेकडो बैलगाड्या संघ व शेतकरी सहभागी झाले होते.
बैलगाडा शर्यतीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरीशेठ फडके व माजी आमदार धैर्यशील पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, यावेळी बैलगाड्या शर्यती सूरू झाल्याने सर्वानाच आनंद होत आहे. दुर दुर वरून शर्यत प्रेमी इथे आले असून त्यांच्यातही आनंदाचे वातावर आहे.यापुढेही नियम पाळून बैलगाड्या शर्यती सुरूच राहतील असे बैलगाड्या शर्तीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांनी सांगितले