• पेण येथील डॉ.शेखर धुमाळ राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित
• यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न झाला पुरस्कार वितरण सोहळा
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवा देणारे व नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे पेण येथील डॉक्टर शेखर रामदास धुमाळ यांना सह्याद्री तर्फे आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास नाशिकचे नगरसेवक राहुल दिवे, सह्याद्री उद्योग समूहाचे संस्थापक संदीप थोरात आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पेण तालुक्यातील जोहे गावातील डॉक्टर शेखर रामदास धुमाळ हे मागील चाळीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रात आहेत. मुंबई विद्यापीठात प्रथम आलेल्या डॉक्टर धुमाळ यांनी सुरुवातीला शासकीय रुग्णालयात सेवा केली. .
वैद्यकीय क्षेत्राबरोबर, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात देखील डॉ.शेखर धुमाळ यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना आता पर्यंत गुणिजन रत्न पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार व गोवा रत्न पुरस्कारासह असंख्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर शेखर धुमाळ यांना आरोग्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे