Type Here to Get Search Results !

अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान


अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


        हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १८ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी पावसाच्या काही हलक्या सरी बरसल्या तसेच ढगाळ वातावरण देखील होते.
      अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला होता. परंतु अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बागायतदारांचे वारंवार नुकसान होताना दिसून येते व चांगले आलेले उत्पादन वाया जात आहे. त्यामुळे बागायतदारांना मोठ्या आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच काही बागायतदारांचे आर्थिक स्थिती ही काही प्रमाणात आंबा उत्पादनावर अवलंबून असते त्यामुळे चिंतेचे वातावरण हे दिसून येते.
        तसेच काही काळ उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी देखील पुन्हा उष्णते मध्ये कमालीची वाढ होताना दिसून येते तापमान हे जवळपास 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले दिसून येतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test