• वाढत्या उष्णतेमुळे पर्यटन व्यवसायाला चालना.
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतांना दिसून येत आहे. तसेच उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे वाढत्या तापमानामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले दिसून येतात त्यामुळे मुंबई, पुणे अशा अनेक शहरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर बीच व वॉटर पार्क अशा ठिकाणी जाण्यास पसंती देताना दिसून येत आहेत. त्यामुळे बीच वॉटर पार्क ही ठिकाणी गजबजलेली दिसून येतात.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम दिसून आला पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणारे लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर याचा परिणाम दिसून येतो.
पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने स्थानिक लोकांमध्ये चिंतेचे वातावरण देखील दिसून येत होते. परंतु आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने नियमांमध्ये शिथिलता आली आहे त्यामुळे पर्यटन स्थळे पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळे जसे की महाबळेश्वर अशा अनेक प्रसिद्ध ठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने अशा ठिकाणी भेट देतात त्यामुळे पर्यटन स्थळे ही गजबजलेली आहेत. तसेच तेथील स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध झाल्याने तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे त्यामुळे तेथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल व रोजगारही वाढीस लागेल.