• म्हसळ्यात नारी शक्तीचा जागर
● वेगवेगळ्या कार्यक्रमांनी महिला दिन साजरा
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. म्हसळा नगरपंचायत, पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, वसंतराव नाईक विद्यालय, म्हसळा पोलीस ठाणे, अंजुमन हायस्कूल, मांदाटणे ग्रामपंचायत अशा विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून म्हसळा नगरपंचायत येथे सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सर्व महिला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सफाई कामगार महिला यांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांनी या दिनाच्या निमित्ताने भरघोष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पं.स. सभापती छायाताई म्हात्रे यांचे प्रकल्प अधिकारी वैष्णवी कळबस्कर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर यांनी दिप प्रज्वलित करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाची सुरुवात एका ३ री ईयत्तेत शिकणारी मुलगी कु.समीक्षा साळवी हिने आई व भ्रुण हत्या या विषयावर कविता सादर केली. प्रकल्प अधिकारी वैष्णवी कळबस्कर यांनी सर्व प्रथम सर्व महिलांना या दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्रीचा मोठा वाटा असतो. महिलांचा आदर करा. महिलांना सन्मानाने वागवा. या प्रकल्पाच्या अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात जसे की महिलांचे आरोग्य बाबत शिबीर, माझी कन्या मातोश्री योजना, स्तनदा माता, गरोदर माता, कुपोषित बालके यांना समतोल आहार, अशा अनेक प्रकारच्या योजना राबवून एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प यांच्या मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पं.स.सभापती छाया म्हात्रे यांनी देखील सर्व महिलांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व खरच महिला आता सक्षम बनल्या आहेत. विविध क्षेत्रात महिलांना मुख्य स्थान प्राप्त झाले आहे. महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. प्रत्येक महिलांनी पुढे यायला पाहिजे,अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे. आज महिला वैज्ञानिक, औद्योगिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी भरारी घेतली आहे. तसेच पोलीस खात्यात पण महिला मोठ्या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे महिला कुठेही मागे नाहीत. तरी देखील काही ठिकाणी महिलांना दुजाभाव दिला जातो. कमी लेखले जाते. भ्रुण हत्या थांबवली गेली पाहिजे.
महिला दिनाच्या निमित्ताने अंगणवाडी सेविका सायली कार्लेकर ( चाफेवाडी) यांनी महिला जागतिक दिनाची सुबक रांगोळी काढून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पर्यवेक्षिका रेणुका पाटील यांनी डोक्यावर पेटती समई ठेवून व हातामध्ये पेटत्या मेणबत्ती घेऊन सत्यम शिवम सुंदरम या गाण्यावर ठेका घेतला त्यांचे न्रुत्य पाहून सर्वांना सुखद धक्का बसला. या न्रुत्याची सगळ्यांनी स्तुती करताना त्यांच्या मधील कलाकार जागृत आहे असे सांगितले. म्हसळा बिटातील अंगणवाडी सेविका यांनी एकांकिका सादर केली. भ्रुणहत्या, लिंगभेद, स्रियांवर होणारे अत्याचार, समाजकंटक पासून होणारे मानसिक त्रास, स्रिया ह्या फक्त उपभोगाची वस्तू म्हणून पाहणारे नराधम, निर्भया प्रकरण, या ज्वलंत विषयावर नाटिका सादर करून समाजाला एक प्रकारे संदेश दिला. कारण आज पण निर्भया प्रकारासारखे अत्याचार स्रियांवर होत असून हे अत्याचारी समाजकंटक आज पण मोकाट फिरत आहेत. आणि आपण फक्त मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करतो. कारण त्यांना कायद्याचे धाक नाही. यासाठी कठोर कायदा आमलात आणने गरजेचे आहे. इतर काही अंगणवाडी सेविका यांनी आपले कलागुण सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमाला म्हसळा पं.स.सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, प्रकल्प अधिकारी वैष्णवी कळबस्कर, वैद्यकीय अधिकारी पाटील, सभापती छायाताई म्हात्रे पं.स.सदस्या उज्वला सावंत, वैद्यकीय अधिकारी प्रियंका देशमुख, परकाळे,चंद्रसेन चौधरी, जि.आर. पाटील,अनिल बसवत, मिना टिंगरे, पालवेमँडम, रेणुका पाटील,गायकवाड, अरविंद बेनवार ,कल्पेश पालांडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हसळा अंजुमन हायस्कूल, वसंतराव नाईक महाविद्यालय व म्हसळा पोलीस ठाणे येथे म्हसळा तहसीलदार समीर घारे व म्हसळा पोलीस निरीक्षक उध्दव सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चँम्पियन कराटे क्लब, म्हसळा या विद्यार्थी व प्रशिक्षक अविनाश मोरे यांनी स्वरक्षणार्थ प्रात्यक्षिक सादर केले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला, मुली पुढे यायला पाहिजेत. व स्वताचे आत्मसंरक्षण करण्यासाठी मुलींनी सक्षम बनले पाहिजे. यासाठी कराटे, काठी फिरवीणे, तलवार बाजी, नानचाकु ,दानपट्टा फिरविणे,आदीचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. यावेळी अविनाश मोरे यांनी व्रुक्षलागवड केली या कार्यक्रमाचे आयोजन म्हसळा पोलीस निरीक्षक उध्दव सुर्वे यांनी उत्तम प्रकारे केले. या कार्यक्रमात प्रशिक्षक अविनाश मोरे, म्हसळा तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक उध्दव सुर्वे, अभय कलमकर, मनोहर तांबे. जाधवसर, उपस्थित होते.
म्हसळा रा.जि.प.शाळा नंबर. १ येथे जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षकांनी रांगोळी स्पर्धा, प्रश्न मंजुषा, मुलींना वेगवेगळ्या वेषांतर म्हणजे कुणी झाशीची राणी, ईंदीरा गांधी, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अशा वेषभुषेत आल्या. गाणे सादर करणे. सर्व विद्यार्थी यांनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या, शिक्षकांनी देखील मनोगत व्यक्त केले. भेदभाव, वर्ण भेद नसावा, मुलींना समानतेची वागणूक द्या, नारी शक्ती चे अनेक रुप आहेत. या विषयावर थोडक्यात माहिती दिली. या कार्यक्रमात सुमित्रा खेडेकर, मुख्याध्यापिका शुभदा दातार, नगरसेविका राखी करंबे, वंदना खोत, ईंदीरा चौधरी, मेहता मँडम, पाटील मँडम, पालक वर्ग उपस्थित होते.