• म्हसळा एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
● महिलांसाठी आरोग्य विषयक शिबिराचे केले होते आयोजन
◆ आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे राहिली नाही - पं.स.सभापती छायाताई म्हात्रे यांचे प्रतिपादन
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
दिनांक 08 मार्च 2022 रोजी महिला दिनाचे औचित्याने म्हसळा तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात जागतिक महिला दिन पंचायत समिती सेस सन 2020 - 2021 अंतर्गत कार्यक्रम घेऊन महिलांना आरोग्यविषयक गरोदर माता, स्तनदा माता आहार, गरोदर माता एचबी, वजन वाढीचे महत्व, कुपोषण कमी करणे याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता तसेच माझी कन्या भाग्यश्री, वात्सल्य समितीच्या बाबत शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सुरुवातीला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती व्ही.आर.कळबासकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर गट विस्तार अधिकारी प्रतिनिधी श्री.परकाळे यांनी महिला बचत गटाचे महत्व सांगून आर्थिक नियोजन व महिलांचे सक्षमीकरण याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय अधिकारी श्रीमती स्नेहा पाटील व श्रीमती प्रियंका देशमुख यांनी गर्भवती माता व स्तनदा माता तसेच शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे आरोग्य विषयी बाबत मार्गदर्शन केले.
पंचायत समितीच्या सभापती छायाताई म्हात्रे यांनी पंचायत समिती सेस फंडातून महिलांचे सक्षमीकरण, महिलांच्या आरोग्याचे विषयक ज्ञान देण्याचे महत्त्वाचे नियोजन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे असे सांगितले तसेच आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे राहिली नाही, तर पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळेल त्या त्या क्षेत्रात काम करून आपला वेगळा ठसा उमटवित असल्याचे सांगितले आणि उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीचे उपसभापती संदिप चाचले यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की प्रत्येक यशस्वी आणि कर्तबगार पुरुषांच्या मागे कर्तृत्ववान स्त्री चा हात असतो, संसाराचा गाडा सुरळीतपणे हाकण्याचा काम स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने करीत असल्याचे समाधान व्यक्त करताना अंगणवाडीतूनच लहान मुलांवर सुसंस्कार घडविण्याचे कौतुकास्पद काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत असल्याने त्यांचे कामाचे विशेष कौतुक उपसभापती संदिप चाचले यांनी केले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सभापती छायाताई म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, माजी सभापती व विद्यमान सदस्या उज्वलाताई सावंत, ग्रामपंचायत रेवली माजी सरपंच मीना टिंगरे, ग्राप पाभरे सरपंच अनिल बसवत, वैद्यकीय अधिकारी स्नेहा पाटील, प्रियंका देशमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही.आर.कळबासकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती ओ. एस. श्री.चौधरी, विअ.सां.श्री.परकाळे, विस्तार अधिकारी (ग्राप) सुनिल गायकवाड, तालुका समन्वयक सचिन निकम, वि.अ.सां.श्री.प्रमोद गायकवाड, पर्यवेक्षिका रेणुका पाटील, पर्यवेक्षिका दिपाली पालवे, कनिष्ठ सहाय्यक श्री.बैंनवाड, गटसमन्वयक कल्पेश पालांडे यांसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
म्हसळा एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा