• दिघी सागरी पोलीस ठाण्यात महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा
• ज्या आईने जन्म दिला जिनी जग दाखवला तिच्या कार्याला सलाम- सा. पोलीस निरीक्षक संदिप पोमन
रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या विध्यमनाने महिला दिनी विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले श्रीवर्धन उप विभागी अधिकारी प्रशांत स्वामी, दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस पोलीस निरीक्षक संदिप पोमन, पोलीस उप निरीक्षक कर्माराज गावडे, जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर, माजी सभापती मीना गाणेकर, सरपंच ज्योती परकर, ग्रामपंचायत सदस्या सायली गाणेकर, समिधा तोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी जागतीक महिला दिनाचा सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले सर्वांना माहिती आहे माता जिजाऊ, गानकोकिळा लता मंगेशकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, अहिल्याबाई होळकर, किरण बेदी, मदर तेरेसा, अशा अनेक महान स्त्रिया आहेत ज्यांनी आपल्या कार्याचा आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा आपल्या देशामध्ये उमटवलेला आहे या सर्व स्त्रियांना अभिवादन करून जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एक उल्लेख करतो आमची आई तीने मला घडवलं यामुळेच मी आज या ठिकाणी आहे त्यामुळे आईच्या देखील कर्तुत्वाला सलाम.
आपल्या दिघी सागरी पोलीस पोलीस स्टेशन बरोबरच सर्वच जिल्ह्यामध्ये आणि सर्व ठिकाणी हा दिवस साजरा होतोय. आपणही या ठिकाणी सकाळपासून रांगोळीच्या स्पर्धा त्याचबरोबर पाककला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
आपण सर्वजण पाहतो आहोत समोर पोलीस युनिफॉर्म घातलेल्या मुली असे सर्वांचा या ठिकाणी एक वेगळा दिवस आणि महिलांचा सन्मान करण्याचे काम या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिघी सागरी पोलीस ठाण्याने या दिनानिमित्त केला आहे. श्रीवर्धन उप विभागी अधिकारी प्रशांत स्वामी यांनी आपल्या मनोगतात ज्या मुलींनी सहभाग घेतला त्या सर्वांचे अभिनंदन केले चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सां. पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी केल आहे त्या बद्दल त्याचे देखिल अभिनंदन करुन सर्व महिलाना सर्वांना जागतिक महिला दिनाच्या श्रीवर्धन विभागाकडून रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शुभेच्छा देत जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर योग्य तो मार्गदर्शन प्रशांत स्वामी यांनी केले ते पुढे म्हणाले की दरवर्षी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत आताची परिस्थिती आहे स्त्री-पुरुष समानता त्यावेळेस नव्हती कुठलेही हक्क महिलांना दिले गेले नव्हते परंतु एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणता येईल खऱ्या अर्थाने जागृती झाली त्यांच्या हक्कांची जाणीव झाली आणि 1917 मध्ये यावेळेस पहिले महायुद्ध चालू होता त्यावेळेस रशियन राज्यक्रांती झाली तिथून सुरूवात झाली रशियामध्ये कामगार महिलांनी रोटी आणि शांतता यासाठी आंदोलन पुकारलं कारण त्यावेळेस पहिलं महायुद्ध चालू होतं अन्नाचा तुटवडा चालू होता त्यामुळे यासाठी त्यांनी आंदोलन केलं सर्व महिला रस्त्यावर उतरल्या आणि तिथून सुरूवात झाली त्या चळवळीची त्याचे आंदोलन वाढलं त्याचाच परिणाम म्हणून त्या वेळेस पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तो दिवस 8 मार्च 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला दिन सुरुवातीला साजरा केला 1975 लहान 1977 सर्व सदस्य यांनी राष्ट्रची बैठक घेऊन जाहीर केलं की दरवर्षी आठ मार्च जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाईल आणि त्या दिवशापासून दरवर्षी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशनला करण्यात आलेली स्पर्धा घेण्यात आल्या पूर्ण पोलीस स्टेशन महिलांनी सांभाळत विशेष करून कॉलेजच्या मुलींनी प्रभारी अधिकारी म्हणून काम केलं मगाशी मी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे पाच मिनिट त्यांचे अनुभव काय होते दिवसभराचे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितले सर्व महिलांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला
आपणा सर्वांना माहिती आहे स्त्री म्हणजे मांगल्य मुर्ती. स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तुत्व अशा या वात्सल्याची खाण. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्त्रीयांचा पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्टेशनच्या सर्व महिला अंमलदार यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमासाठी पत्रकार बांधव, महिला वर्ग, पोलीस अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल दिघी सागरी पोलीस ठाणेतर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.