जाणून घेऊया हा आठवडा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा जाईल.
०१) मेष रास
गोड बोलून कामं पूर्ण करून घेणे हिताचे. रागाला आवर घालणे लाभाचे. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून कामांचे नियोजन करणे फायद्याचे. वाद टाळणे सोयीचे. स्वतःला बदला जग बदलेल हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.
शुभ रंग - किरमिजी
०२) वृषभ रास
प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. परिस्थितीशी जुळवून घेणे फायद्याचे. प्रगतीवर लक्ष केंद्रीत करणे सोयीचे. अडचणी दूर होतील आणि अनेकांची मदत लाभेल. इतरांवर प्रभाव पाडाल.
शुभ रंग - निळा
०३) मिथुन रास
नियम कायदे पाळणे हिताचे. कायदेशीर प्रश्न सुटतील. क्षमतेचे भान राखणे आणि व्यावहारिक राहणे सोयीचे. हिशेबी वृत्ती फायद्याची. विरोधकांना नामोहरम कराल. वाद टाळणे लाभाचे.
शुभ रंग - हिरवा
०४) कर्क रास
क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. वास्तवाचे भान राखून व्यवहार जपणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. व्यस्त राहाल. इतरांकडून अपेक्षा बाळगणे सोडा. कोणालाही शब्द देणे किंवा जामीन देणे टाळा. अतिरेक टाळा.
शुभ रंग - चंदेरी
०५) सिंह रास
अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे निर्णय पुढल्या आठवड्यावर ढकला. कायदेशीर गुंते सोडविण्यासाठी वेळ मागून घेणे सोयीचे. अतिरेक टाळणे आणि संयमाने वागणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. पडेल ती जबाबदारी नियोजन करून पार पाडा.
शुभ रंग - नारिंगी
०६) कन्या रास
ओळखीतल्यांसोबत वेळ मजेत जाईल. ज्येष्ठांचे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभेल. वाद टाळणे हिताचे. जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणे लाभाचे. परिस्थितीशी जुळवून घ्या.वरिष्ठांशी जुळवून घ्या.
शुभ रंग - मोरपिशी
०७) तूळ रास
वाद टाळणे, नियोजन करून काम करणे फायद्याचे. परिस्थितीशी जळवून घेणे, सामंजस्य दाखणे हिताचे. कायदे नियम पाळा.
शुभ रंग - आकाशी
०८) वृश्चिक रास
आर्थिक प्रश्न सुटतील.प्रिय व्यक्तींची साथ मिळेल. ओळखीतल्यांची मदत मिळेल. सामंजस्याने प्रश्न सुटतील. सत्यवचनी राहणे हिताचे.
शुभ रंग - गुलाबी
०९) धनु रास
महत्त्वाकांक्षी आहात. स्वप्न पूर्तता करू शकाल. स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचा आनंद शोधाल. वाद टाळा. व्यवहारात नियम कायदे पाळा.
शुभ रंग - सोनेरी
१०) मकर रास
आर्थिक प्रश्न सुटतील. प्रगती होईल. आनंद, सुख यांची अनुभुती मिळेल. आपला प्रभाव वाढेल. नियम कायदे पाळणे आणि वाद टाळणे हिताचे.
शुभ रंग - जांभळा
११) कुंभ रास
ओळखीतल्यांची साथ लाभेल. अडलेली कामं होतील. आर्थिक लाभ होईल आणि प्रगती होईल. आधी खर्च वाढेल नंतर उत्पन्न वाढेल. प्रवास घडेल. नियम कायदे पाळणे हिताचे. नियोजन लाभाचे.
शुभ रंग - जांभळा
१२) मीन रास
वेळ पाळणे, नियोजन करणे, वाद टाळणे हिताचे. प्रगती होईल. समाजकार्य आणि धार्मिक कार्य घडेल. वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहार जपणे हिताचे. सामंजस्य फायद्याचे. कामं वेगाने पूर्ण कराल. इतरांवर प्रभाव टाकाल.
शुभ रंग - सोनेरी