• चाकरमानी होळीसाठी गावी निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर ३ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा,पोलादपूर शहरात सर्विस रस्त्यावर वाहतूक कोंडीचे ग्रहण
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी गावी निघाल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली असून महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पोलादपूर शहरात धीम्या गतीने सुरू असून अनेक समस्या उद्भवत आहेत.सध्या महामार्गाची वाहतूक पोलादपूर शहरातून सर्विस रस्त्यावरून सुरु आहे मात्र एका सर्विस रस्त्यावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.त्यातच कोकणकरांचा आवडता असलेला होळी सण आज साजरा होणार असून चाकरमानी गावी मोठ्या संख्येने गावी नीघाले असल्याने बुधवारी सकाळच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर चोळई ते पोलादपूर ग्रामीण रुग्णालय पर्यंत जवळपास तीन किलोमीटरचा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहन चालकांना तासन्तास ताटकळत राहावे लागले. वारंवार वाहतूक कोंडीची घटना होत असून देखील होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने चाकरमानी व पोलादपूरवासियांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने गावी निघाल्याने बुधवारी संपूर्ण दिवसभर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती