• खाजगी वाहनांकडून प्रवाशांची लूटमार
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
कोरोना काही प्रमाणात कमी झाल्याने नियमांमध्ये शिथिलता आली त्यामुळे शिमगोत्सवाला गावाला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती परंतु एसटीचा संप असल्याने त्यांना गावाला जाण्यासाठी खासगी वाहनांवर वाहनांचा आधार घ्यावा लागत होता खासगी वाहने सामान्य जनतेची लूट करताना दिसून आली मुंबई - पोलादपूर एसटी साधारण २०० रुपये आकारते त्याच ठिकाणी खासगी बस ही साधारण ८०० रुपये आकारण्यात येत आहेत तरी देखील साधन कमी पडल्याने कित्येक लोकांना खाजगी लहान वाहनांवर अवलंबून राहावे लागले जे ५ माणसांसाठी १३ ते १५ हजार रुपये आकारण्यात आले होते. रिक्षा साधारण १० ते १२ किलोमीटर साठी एसटी २० रुपये आकारते या ठिकाणी रिक्षा आणि अन्य वाहने ७०० रुपये आकारत आहेत.
एसटीचा संप जास्त फटका शाळकरी तसेच ग्रामीण भागातील लोकांवर परिणाम होताना दिसून येतो. कारण त्यांच्यासाठी त्यांना सोयीस्कर असे वाहन हे गावांमध्ये उपलब्ध नाहीt शाळा महाविद्यालय येण्यासाठी मुले कित्येक किलोमीटर चालत आहेत तर कधी मालवाहतूक गाड्यांचा वापर करत आहे जसे की टेम्पो पिकप इत्यादी.
गावांमध्ये रूग्णालय उपलब्ध नसल्याने वृद्ध तसेच आजारी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पर्यंत जाण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे त्याचा फायदा घेऊन वाहने जास्त पैसे आकारत आहेत.
ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही प्रकारचा संप जसे की आरोग्य विभाग , नगरपालिका, रिक्षा, टॅक्सी किंवा एसटी संप यामध्ये नेहमी सामान्य माणूस भरडला जातो.