Type Here to Get Search Results !

• एसटी संपामुळे श्रीवर्धन मधील प्रवाशांचे प्रचंड हाल • होळीला येण्यासाठी खाजगी वाहतुकदार घेतात अव्वाच्या सव्वा भाडे • ७ दिवसच उरले असतानाही महामंडळाकडून घोषणा नाही


• एसटी संपामुळे श्रीवर्धन मधील प्रवाशांचे प्रचंड हाल 

• होळीला येण्यासाठी खाजगी वाहतुकदार घेतात अव्वाच्या सव्वा भाडे 

• ७ दिवसच उरले असतानाही महामंडळाकडून घोषणा नाही


रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन


दिघी - एसटी कर्मचाऱ्यांनी दिवळीपासून संपाचे हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रायगड जिल्ह्यातील बहुतांश स्थानकांमध्ये शुकशुकाट आहे. आता तर होळी उत्सव सात दिवसांवर येऊन ठेपला असताना श्रीवर्धन आगारातून एसटी बसच्या फक्त ३ - ४ फेऱ्या सुरू आहेत. लांब पल्ल्याच्या फेऱ्या पूर्ण बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मात्र संपाचा फायदा उठवत अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट सुरू केली आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शाळा पूर्वत सुरू झाल्याने विद्यार्थीही उत्सुक होते. श्रीवर्धन तालुक्यातील पाचवीनंतरच्या जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्याने शिक्षण व्यवस्था रुळावर येत असतानाच एसटीच्या संपाचे ग्रहण लागले आहे. आता होळीसाठी गावाकडून मुंबई तसेच मुंबईहून गावी जाण्यासाठी एसटी वाहतूक परवडण्यासारखी व सुरक्षित असते त्यामुळे आबालवृद्धांपासून सर्वचजण एसटी ला प्राधान्याने पसंती देतात मात्र, सध्या विलनिकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी संपावर आहेत. याचा फायदा घेत खाजगी वाहतुकदारांनी तिकीट दरामध्ये वाढ सूरु केली आहे. त्याचा मोठा फटका हा एसटी महामंडळ व सामान्य प्रवाशांना बसत आहे. 

श्रीवर्धन किंवा बोर्लीपंचतन मधून मुंबई तसेच नालासोपारा जाण्यासाठी ४०० ते ५०० रुपये भाडे खाजगी वाहतुकदार घेत होते. मात्र, पुढे होळी उत्सवात आणखी तिकीट दर वाढणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती प्रवाशांना मिळत आहे. त्यांच्या वर कुणाचेही वचक नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शासनाने एसटी वाहतूक पूर्वत करण्यासाठी लवकरच तोडगा काढावा कारण ऑक्टोबर २०२१ पासून एसटी संप सुरू आहे. संपकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढून राज्यातील वाहतूक पूर्ववत करण्याची कोणतीही मानसिकता दिसून येत नाही. या काळात खासगी बसचालक प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेऊन अरेरावी करत अतिरिक्त दराने प्रवासी वाहतूक करत आहे. यामुळे कोकणातील तमाम प्रवाशांचे होळीनिमित्त महामंडळाच्या विशेष गाड्यांकडे लक्ष लागले आहे. 

तीनच गाड्या मुंबई धावतात - 

श्रीवर्धन आगारातून सद्या मुंबईसाठी सकाळी ३ वाजून ४५ मिनिटांनी श्रीवर्धन - बोर्ली - मुंबई, स. ५ वाजता श्रीवर्धन - मुंबई तर ८ वाजता श्रीवर्धन - मुंबई या तीनच गाड्या सुरू असून पनवेल पर्यंत तीन बस सोडण्यात येतात.

होळीची अजून तयारी नाही -

श्रीवर्धन बसस्थानकातून सद्या मुंबईसाठी तीन व पनवेल पर्यंत तीन बस सुरू आहेत. येत्या काही दिवसांत आवश्यकतेनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांनी व सरकारने समन्वयाने एसटी वाहतूक पूर्वत करावी. कुणाविषयी आणखी सहानुभूती राहिली नाही. प्रवाशांचे एसटी अभावी होत असलेले हाल व आर्थिक पिळवणूक ही गंभीर बाब आहे व तितकीच संताप आणणारी आहे. 
- सुनील रिकामे, मुंबईस्थित, नागलोली. 

दरवर्षी महिनाभरआधी कोकणात जाण्यासाठी होळीनिमित्त विशेष गाड्यांची घोषणा करण्यात येते. यंदा होळीला जेमतेम आठवडा बाकी असतानाही या गाड्यांची घोषणा झाली नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे.
- संदेश दिवेकर, प्रवासी. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test