• तेलंगणाचा ड्रीम प्रोजेक्ट श्री लक्ष्मी नृसिंह स्वामींच्या यदाद्री मंदिराचे उद्घाटन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते संपन्न.
• जगातील सर्वात मोठे बहुप्रतिक्षित यदाद्री मंदिर भाविकांसाठी खुले.
टिम रायगड वेध
तेलंगणाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सुमारे १२०० कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या श्री लक्ष्मी नृसिंह स्वामींच्या यदाद्री मंदिराचे उद्घाटन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते करण्यात आले. आता हे बहुप्रतिक्षित यदाद्री मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
तेलंगणा नवीन राज्य करण्यासाठी आंध्र प्रदेश मधुन विभागले गेले. तिरूमलाचे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, श्रीशैलमचे मल्लीकार्जुन स्वामी मंदिर, चित्तुरचे श्री कलहस्ती मंदिर अशी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची मंदिरं आंध्रप्रदेश मध्ये गेली. तेलंगणाच्या पदरात काहीच उरले नाही. यामुळेच राज्याला पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध करण्यासाठी २०१५ साली यादगिरी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. व २०१६ पासून मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या १०० वर्षांत कृष्णशिलेत बांधण्यात आलेले जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. संपूर्ण स्थापत्यशास्त्रानुसार या मंदिराच्या वास्तूची निर्मिती करण्यात आली आहे. मोठमोठे महालही या मंदिरासमोर फिके पडतील, अशी याची सुंदर रचना करण्यात आली आहे.
यद्रादी मंदिराच्या प्रकल्पावर तेलंगणा सरकारने १२८० कोटी खर्च करण्याचे ठरवलेले आहे. यातील १००० कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आला आहे.
१४० किलो सोन्याचा वापर
मंदिरात १४० किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. यातील १२५ किलो सोने हे गर्भगृहात वापरण्यात आले आहे. या सोन्यापैकी खुप सारे सोने तेलंगणातील राजकीय प्रमुख, मंत्री, उद्योजक यांनी दान स्वरूपात दिले आहे. मुख्यमंत्री केसीआर यांच्या कुटुंबीयांनी १११६ ग्रॅम सोने दान दिले आहे. या मंदिराचे बांधकाम ब्लॅक ग्रॅनाईटमधून (कृष्णशिला) करण्यात आले आहे, तसेच बांधकामासाठी सिमेंटंचा वापर न करता चुन्याचा वापर करण्यात आला आहे. १७ एकर परिसरात बांधण्यात आलेल्या या भव्यदिव्य अशा या मंदिराला पुढील १ हजार वर्ष काहीही होणार नाही, असा दावा मंदिर निर्माणचे प्रमुख वास्तुविशारद आनंद साई यांनी केला आहे.
जाणून घेऊयात अधिक या मंदिराविषयी
• तेलंगणाच्या यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यात १००० वर्षांपूर्वीचे हे नृसिंहांचे मंदिर आहे.
• ५१० फूट उंचीवर यदाद्रीगुट्टा डोंगरावर हे मंदिर आहे, त्यात १२ फूट उंच आणि ३० फूट लांब गुहा आहे. गुहेत ज्वाला नृसिंह, गंधभिरंदा नृसिंह आणि योगानंद नृसिंह अशा तीन मूर्ती आहेत.
• आंध्रप्रदेशातून स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यानंतर या मंदिराची भव्य योजना साकारण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री केसीआर यांनी लक्ष घालून या मंदिर निर्माण काम पुर्णत्वास नेले आहे.
• या परिसराच्या जीर्णोद्धारासाठी १२०० कोटींचा खर्च अंदाजित ठेवण्यात आला होता.
• या कामाची देखरेख स्वत: मुख्यमंत्री के चंद्रशेखर हे करीत होते.
• दक्षिणेतील सहा वैष्ण संप्रदायांच्या मंदिरांचा ( बालाजी तिरुपतीसह) अभ्यास केल्यानंतर या मंदिराची योजना तयार करण्यात आली.
• २०१५ साली आर्ट डायरेक्टर आनंद साईंनी डिझाईन तयार केले. एका वर्षांच्या संशोधनानंतर मंदिराची रचना नक्की करण्यात आली.
• जुन्या गर्भगृहाला स्पर्शही न करता परिसराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवण्यात आले.
• कोणता दगड वापरायाचा यावर अभ्यास करुन मग कृष्णशीलेची निवड करण्यात आली.
• शास्त्रांनुसार दगडांवर नक्षीकाम करण्यासाठी चार ते पाच पिढ्या ज्यांच्या घरात याचा वारसा आहे असे ५०० मूर्तीकार शोधण्यात आले.
• चार वर्षे तामिळनाडू, आंध्रतील या कारागिरांची राहण्याची व्यवस्था मंदिर परिसरात करण्यात आली.
• एप्रिल २०१६ साली मंदिराचा पहिला खांब उभारण्यात आला, त्यानंतर पाच वर्षांची मुदत मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
• चार मिनार, गोवळकोंडा किल्लेही अशाच प्रकारे चुन्याच्या बांधकामात तयार करण्यात आले आहेत.
• १० किलो सोन्याचा वापर हा ध्वजस्तंभ आणि मुख्य दरावाजावर करण्यात आला.
• गर्भगृहात १२५ किलो सोन्याचा वापर केला.