• अखंड भंडारी समाज सेवा संघ श्रीवर्धन म्हसळा बागमांडले विभागाच्या वतीने समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व स्व. भागोजी कीर यांची जयंती आणि पुण्यतीथी उत्साही वातावरणात साजरी.
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे-गालसुरे येथे मंगळवार दि.१ मार्च रोजी महाशिवरात्री दिवशी जयंती आणि पुण्यतिथी अखंड भंडारी समाज सेवा संघ म्हसळा-श्रीवर्धन यांच्या बागमांडला विभागीय कमिटीच्या आयोजनातून विश्वस्थ विठोबा देवकर यांच्या निवास स्थानी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
स्वर्गीय श्री.भागोजी बाळूजी कीर यांचा जन्म ४ मार्च १८४१ तर २४ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला. मृत्यू याच महा शिवरात्री च्या दिवशी झाला.रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्यावर एका झोपडीत त्यांचा जन्म झाला.अठरा विश्व दारिद्र्यात त्यांचं बालपण गेलं.जे वय खेळायचे होते त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडीच्या बिया विकून कुंटुबा करीता २/४ आणे मिळवत असत.वडील बाळूजी शेतमजूर तर आई लक्षमी बाई धार्मिक आणि सात्विक होत्या.त्यांना गरिबीत संसाराचा गाडा चालवतांना घ्यावे लागणारे कष्ट भागोजीना अस्वस्थ करणारे होते.त्यांना शिक्षणाची मोठी आवड होती.वयाच्या १२ व्या वर्षी बोटीतील एका तांडेलाच्या सहकाराने मुंबई गाठली.आणि एका सुतारकाम करणाऱ्या व्यक्ती बरोबर रंधा मारण्याचे काम मिळाले.
दिवसाला दोन आणे मजुरी मिळायची काम करता करता एक दिवस त्यांना रंध्याच्या भूशात लक्षमी दिसली.मालकाच्या परवानगीने लाकडाचा भुसा बाजारात विक्रीसाठी जायला लागले.त्यातून त्यांना दोन आणे मिळायचे.जमतील तेवढे पैसे आई-वडिलांना गावी पाठवायचे.ऐके दिवशी मालकाने लपवलेले पैशाचे बंड्डल त्यांना मिळाले ते ईमानदारीत मालकाच्या स्वाधिन केले.प्रामाणिक पणावर मालक भागोजींवर बेहद्द खुश झाला.त्यांच्या वर प्रसन्न झाला.ऐके दिवशी त्यांना भागीदारीत सामावून घेतले.हळू हळू ते मुंबईतील तत्कालीन सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शापुरजी पालंजी यांच्या बरोबर कामं करू लागले. ते एक बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपाला आले त्याकाळी भंडारी समाजातील नेते आणि बांधकाम उद्योगपती म्हणुन त्यांनी मुंबईत लायन्स गार्डन,सेंट्रल बँक ईमारत, ब्रेबोर्न स्टेडियम, इंडियन मर्चंड चेंबर्स,मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया ईमारत या इमारती बांधण्यात भागोजींच्या सहभाग होता. शिवाय मरीन लाईन्स गिरगांव चौपाटीवरची संरक्षण भिंत त्यांनीच बांधली.ते इथेच थांबले नाहीत तर महाराष्ट्रात अनेक धार्मिक कामं केली आहेत.
भागोजींनी मुंबईसह पुणे,आळंदी, वाई, सातारा, रत्नागिरी व अन्य ठिकाणी मंदिरं, धर्मशाळा, गोशाळा, नदीकाठी घाट बांधले.मुंबईच्या दादर येथील हिंदूभूमी करीता नऊ एकर जमीन स्वतः विकत घेऊन ती विनामोबदला महापालिकेला दान केली आहे.
स्वतः शिक्षणापासून वंचित राहिल्याने गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळावी ही आंतरिक ओढही त्यांना होती. त्यामुळेच व्यावसायिक यशानंतर भागोजींनी गरीबांना शिक्षणाची सुविधा रत्नागिरीतच मिळावी यासाठी पुढाकार घेतला. भंडारी समाजासाठी हे कार्य व्हावे ही मूळ इच्छा असली तरी प्रत्यक्षात सर्वांनाच कसा लाभ होईल याचाही त्यांनी विचार केला.भंडारी शिक्षण परिषदेचे १९२० नंतरचे रत्नागिरी अधिवेशन त्यांनी स्वखर्चाने प्रायोजित केले होते.
भागोजी गाडगेबाबा यांना आध्यात्मिक गुरू मानत. त्यांच्या सांगण्या वरून भागोजींनी आळंदीत धर्मशाळा बांधल्या, तिथे यात्रेकरूंसाठी अन्नछत्र सुरू केले. भागोजी कीर यांनी फक्त पैसा उभारला नाही. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्ये हाती घेतले. रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला आणि महत्त्वाचे म्हणजे सावरकरांच्या कल्पनेतले पतितपावन मंदिर बांधून दिले.२२ फेब्रुवारी १९३१ ला हे मंदिर बांधून सर्वांसाठी खुले झालं.पतितांना पावन करणारे म्हणून सावरकरांनी त्या मंदिराचं नाव ‘पतितपावन मंदिर’ असे ठेवलं.अस्पृश्यांसह सर्व हिंदूंसाठी मुक्तद्वार असलेले ते भारतातलं पहिलं मंदिर ठरले.अशा प्रकारे सामाजिक क्रांतीत भागोजी कीरांनी हातभार लावला आहे.
असे हे भंडारी समाज बांधव,दानशूर,मॅनेजमेंट गुरु,राष्ट्रपुरुष एक क्रांतिकारक देधभक्त स्वर्गीय श्री.भागोजी बाळूजी कीर यांच्या प्रतिमेला श्रीवर्धन तालुका भंडारी समाज अध्यक्ष कृष्णकांत साखळे, उपाध्यक्ष नरेश बोरकर यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी विश्वस्थ विठोबा देवकर,बागमांडला विभागीय अध्यक्ष रामकृष्ण मांजरेकर,उपाध्यक्ष दिपक देवकर,सेक्रेटरी शाम तोडणकर, खजिनदार प्रविण मयेकर, अमरनाथ आरेकर, परेश कोलथरकर, प्रशांत सातनाक, सौरभ कोलथरकर, सुमित मयेकर, संदिप कोलथरकर, सागर करदेकर, सचिन कनगुटकर, सत्यजित पुसाळकर, चलेंद्र पोलेकर, अभय पोलेकर, सुरेश पोलेकर, अजय पोलेकर, शैलेश पोलेकर, दिलीप पोलेकर, सुधिर पोलेकर, संदेश पोलेकर, योगेंद्र साखळे, संजय देवकर, शेखर देवकर, समीर देवकर यांच्यासह बागमांडला, भेंडखोल, हरीहरेश्ववर, काळींजे, निगडी काठी, गालसुरे, गालसुरे काठी येथील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश पोलेकर यांनी केले. स्व. भागोजी कीर यांच्या जीवनावरील माहिती धिरज बोरकर व शाम तोडणकर यांनी सांगितले तर अध्यक्षीय भाषणात स्व. भागोजी किर यांच्या कार्या विषयी माहिती दिली. उदय पाटील यांनी कार्यक्रमाची सांगता केली.