पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या होलिकोत्सव सोहळ्याचे १७ मार्च रोजी आयोजन, सहाणेवर पालखीचे होणार आगमन
रायगड वेध वृषाली पवार पोलादपूर
पोलादपूरचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ महाराजांचा होलिकाउत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी होलिकाउत्सव मोठ्या उत्साहात विधीवत परंपरेने साजरा होणार आहे. गुरुवारी दिनांक १७ मार्च २०२२ ते मंगळवारी दिनांक २२ मार्च पर्यंत पालखी सहाणेवर विराजमान असणार आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द झाले होते. मात्र यावर्षी श्री काळभैरवनाथ महाराजांचा होळीकोउत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गुरुवारी १७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता श्री देव काळभैरवनाथ महाराजांच्या पालखीचे सहाणेवर आगमन होणार असून रात्री १२:१५ वाजता पोलादपूरवासीयांचा उपस्तीतीत होळी लागणार आहे. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ सावंतकोंड, पार्टेकोंड, प्रभात नगर यांची जागरण व्यवस्था असणार आहे. शुक्रवारी १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता धुलीवंदन रात्री ९ ते ११ वाजता भजन- जाखमाता नगर तर ग्रामस्थ मंडळ सह्याद्रीनगर, गोकुळनगर,,जाखमातानगर,मठगल्ली यांची जागर व्यवस्था असणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा रात्री ९ ते ११ वाजता भजन आदिशक्ती महिला मंडळ बाजारपेठ तर ग्रामस्थ मंडळ आंबेडकर नगर, रोहिदास नगर, हनुमान नगर, गणेश नगर यांची जागर व्यवस्था असणार आहे. रविवारी रात्री ९ ते ११ वाजता संगीत संध्या कार्यक्रम असून ग्रामस्थ मंडळ शिवाजी नगर, साईनाथ नगर, जोगेश्वरी गाडीतळ, तांबड भुवन याची जागर व्यवस्था असणार आहे. सोमवारी रात्री ९ ते १० वाजता सभा रात्री १२ नंतर देवाचा गोंधळ असून ग्रामस्थ मंडळ भैरवनाथ नगर, आनंद नगर, सिद्धेश्वर अळी, सैनिक नगर यांची जागर व्यवस्था असणार आहे. तर २२ मार्च रोजी मंगळवार श्री देव काळभैरवनाथ महाराजांची मिरवणूक संपूर्ण शहरातून जाणार असून रंगपंचमी उत्साहात साजरी होणार आहे अशी माहिती देवस्थान मंडळाचे अध्यक्ष बाबुराव महाडिक, खजिनदार शंकर दरेकर, सचिव विजय पवार, सर्व विश्वस्त, सल्लागार यांनी दिली आहे.