Type Here to Get Search Results !

बचत गटांमुळे महिलांना सक्षम होण्यास मदत होईल : सरपंच संतोष कोळी


बचत गटांमुळे महिलांना सक्षम होण्यास मदत होईल : सरपंच संतोष कोळी 


रायगड अनिल पवार नागोठणे रोहा


 रायगडच्या पालकमंत्री ना. कु. आदितीताई तटकरे यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून जागतिक कोरोना महामारी असो किंवा जिल्ह्यावर आलेल्या निसर्ग चक्रीवादळ, महापूर अशा अनेक नैसर्गिक आपत्ती बरोबरच विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आपल्या महिला भगिनींनीही ना. आदितीताईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून सर्वोत्तम कार्य केल्यास बचत गटातील या महिलांना सक्षम होण्यास मदत होईल. तसेच या बचत गटांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण सर्वोतोपरी सहकार्य करु असे आश्वासन पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई कोळी यांनी दिले. 

पिगोंडे ग्रुप ग्राम पंचायतीचे वतीने राज्यमंत्री व रायगडच्या पालकमंत्री ना. कु. आदीतीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक १४ मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या हळदी - कुंकु कार्यक्रम तसेच महिला सक्षमीकरण अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान अंतर्गत दि.१ ते १५ मार्च रोजी महिला वर्धिनी तर्फे रोहा तालुक्यातील आंबेघर - वेलशेत येथील महिला सक्षमीकरण व गरीबी निर्मूलन गट बांधणी अंतर्गत मौजे आंबेघर-वेलशेत गावामध्ये सदर दिवसामध्ये घरोघरी भेटी देऊन एकूण १३ बचत गटाचे समूह तयार केले. त्याबद्दल सदस्य वर्धिनी यांचे निरोप समारंभ आयोजित केले होते त्या निमित्त ग्राम पंचायतीच्या वतीने हळदी कुंकु समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरचे हळदी कुंकु कार्यक्रमास ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांनी पिगोंडे कार्यालयात येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली. सदर कार्यक्रमास सरपंच संतोष कोळी, उपसरपंच नाना बडे, माजी उपसरपंच सखाराम घासे, सदस्य धनाजी पारंगे, शैलेश शेलार, सदस्या कांचन माळी, रंजना माळी, नेत्रा पारंगे, गीता पाटील, कुसुम बावकर आदींसह अनेक मान्यवर व बचत गटांच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. त्याच प्रमाणे या महिला बचत गटांना खास मार्गदर्शन करण्यासाठी रोहा पंचायत समिती मधील प्रभाग समन्वयक नेहा पाटील, तसेच पेण पंचायत समिती येथील कौशल्य समन्वयक भारत वाघ यांनी दिनदयाळ उपाध्याय ग्रामिण कौशल्य योजने मार्फत हाँटेल मँनेजमेंट व्यवसायाची १० वी उत्तीर्ण मुला- मुलींसाठी व्यवसायाबाबत माहीती दिली. यावेळी वर्धा येथील महिला वर्धायिनी कविता बेसिकर, प्रतिमा धनविज, अर्चना धनविज, आम्रपाली गजभिये, विद्या वनकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन संतोष ताडकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test