Type Here to Get Search Results !

• डॉ.नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी वर्षानिमित्त तळा येथे स्वच्छता अभियान.२१४ श्री सदस्यांकडून १३ टन कचरा गोळा.


• डॉ.नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी वर्षानिमित्त तळा येथे स्वच्छता अभियान, २१४ श्री सदस्यांकडून १३ टन कचरा गोळा.



रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


जेष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तळा येथे श्री सदस्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.संपूर्ण देशात आरोग्य, व्यसनमुक्ती याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देत समाजाला निरुपणाच्या माध्यमातून चांगले विचार देणारे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून देशाचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तळा शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या स्वच्छता अभियानामध्ये तळा शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुतर्फा वाढलेले गवत,झुडपे,कचरा,काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या उचलून स्वच्छता करण्यात आली.यांसह सरकारी कार्यालय परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप,रक्तदान आरोग्य शिबीर इत्यादी विविध उपक्रम एक सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय काम म्हणून राबविले जातात याचाच एक भाग म्हणून तळा शहरात देखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या स्वच्छता मोहिमेत १३ टन कचरा गोळा करून त्याची डम्पिंग ग्राउंड येथे विल्हेवाट लावण्यात आली.याप्रसंगी तहसीलदार ए.एम.कनशेट्टी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,तळा नगरपंचायतीचे नगरसेवक,नगरसेविका तसेच २१४ श्री सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test