एस.एस.ओ.एस.पी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत घवघवीत यश
रायगड वेध अनिल पवार रोहा
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परिक्षा २०२१चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत नागोठणे जवळील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.एस.ओ.एस.पी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून ८६.७% गुण मिळवून इलेक्ट्रिकल विभागाची कु. रुचिता वसंत पाटील ही महाविद्यालयातून प्रथम आली.
महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल ८४.१४% इतका लागला. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागाचा ९५.४५%, सिव्हिल विभागाचा ९४.९१%, तर मेकॕनिकल विभागाचा ९७.२९% तसेच कॉम्प्यूटर विभागाचा ९६.७७% इतका निकाल लागला आहे.
दरम्यान इलेक्ट्रिकल विभागातून कु. रुचिता वसंत पाटील ८६.७%, सिव्हिल विभागातून कु. दिप्ती विष्णू भोय ८३.८%, मेकॕनिकल विभागातून कु. सुबोध उदय शिंदे ८५.९१%तर कॉम्प्यूटर विभागातून कु. ऋषभ खंडागळे ८५.४६% यांनी आपापल्या विभागात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच प्रथम वर्ष विभागातून कु.आर्यन महेश माळी ७९% याने प्रथम क्रमांक पटकावला असून या सर्व तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. याचबरोबर महाविद्यालयाची १००% निकालाची परंपरा ह्यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी राखली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा. ज्योती पालवे,सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.रुपेश थळे, मेकॕनिकल विभाग प्रमुख प्रा. सुजित पाटील व कॉम्प्यूटर विभाग प्रमुख प्रा. अस्मिता पाटील या सर्व विभाग प्रमुखांची मेहनत असून कॉलेजचे प्राचार्य प्रविण भारती यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक किशोरजी जैन व संस्थेचे सीईओ कार्तिक जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना त्यांच्या पुढील उज्ज्वल यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.