बनोटी, रेवळी आणि गणेशनगर ग्रुप ग्रामपंचायतीने गाव विकासासाठी केलेला पक्ष प्रवेश व्यर्थ जाणार नाही - खासदार सुनिल तटकरे
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
गाव पंचक्रोशीचा सर्वांगीण विकासासाठी बनोटी, रेवळी आणि गणेशनगर मधील सर्व ग्रामस्थ,महिला मंडळ,ग्रुप ग्राम पंचायत सरपंच अनंत कांबळे,उपसरपंच लोमेश नाक्ती, जयदास कांबळे,रामजी टिंगरे,गाव अध्यक्ष महादेव गाणेकर यांचे सह ग्राम पंचायत तिच्या सर्व सदस्यांनी आणि गाव प्रमुखांनी भाजप मधुन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खासदार सुनिल तटकरे यांचे प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.या वेळी खासदार तटकरे यांनी स्वागत कार्यक्रमात संबोधित करताना आपण आता आमच्यावर विश्वास ठेवा विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही पक्षात प्रवेश करून आम्हाला आपला विकास करण्यासाठी एक प्रकारे आत्मिक बळ दिले असल्याचे मनोगत खासदार सुनिल तटकरे यांनी मौजे बनोटी येथे पक्ष प्रवेश आणि गाव अंतर्गत रस्ते विकास कामाचे भूमीपूजन कार्यक्रमाला व्यक्त करताना सांगितले.
महिला दिनाचे पुर्व संधेला माजी सरपंच मीना टिंगरे,अनिल टिंगरे,आणि माजी सभापती यांनी समाजातील गाववाडीचा विकासाची पडलेली ठिगळ भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आता हा ठिगळ भरून काढण्यासाठी आमचे यशस्वी प्रयत्न राहतील.जशी साथ लोकसभेत खासदार निवडुन आणण्यासाठी मला केलीत त्या पेक्षा जास्त मताधिक्याने राज्य मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांना निवडुन दिलेत तशीच कृपा येणाऱ्या पंचयत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे पाठीशी खंबीरपणे उभी करा असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी तीनवाडी ग्रामस्थांना केले.पक्ष प्रवेश आणि विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमाला खासदार तटकरे यांचे समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदिप चाचले, माजी सभापती महादेव पाटील,युवक अध्यक्ष फैसल गीते,सरपंच अनिल बसवत,संतोष नाना सावंत, रियाजभाई फकिह,गजानन पाखड,गाव अध्यक्ष गणपत गाणेकर, प्रकाश गाणेकर, महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,मीना टिंगरे,अनिल टिंगरे,लहूशेट म्हात्रे, मनोज नाक्ती, तुकाराम पाटील, प्रकाश कोठावले आदि मान्यवर उपस्थित होते.माजी सरपंच मीना टिंगरे यांनी गावातील विकास आदरणीय खासदार सुनिल तटकरे साहेबच करू शकतात हा विश्वास असल्याने आम्ही साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले.खासदार तटकरे यांनी शब्द देताच तिन्ही गावात विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले.