• निलेश नाक्ती दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
• पाच वर्षांत दिव्यांग क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती
रायगड वेध गणेश प्रभाळे बोर्ली पंचतन
मागील पाच वर्षात दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निलेश बारक्या नाक्ती यांना रायगड जिल्हा परिषद कडून दिव्यांग प्रेरणा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी (ता.१६) जिल्हा परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आठ दिव्यांग व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि १०,०००रु. चा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. निलेश नाक्ती यांनी श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील कित्येक दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी योजना, अंत्योदय रेशन कार्ड, पंचायत समितीच्या योजना जिल्हा परिषदेच्या योजना, खाजगी संस्थांच्या योजनेचा लाभ मिळवून दिला. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी विविध मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे, दिव्यांग कायदेविषयक मार्गदर्शन मेळावा, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र अद्यावत करणे असे विविध उपक्रम हाती घेऊन दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्व पूर्ण योगदान नाक्ती यांनी दिले आहे.
एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था श्रीवर्धन अध्यक्ष म्हणून कार्य करताना संघटनेच्या माध्यमातून दिव्यांना मोफत साहित्य (कुत्रीम अवयव) वाटपाचे कार्यक्रम हाती घेऊन दिव्यांग व्यक्तींना प्रवाहात आणण्याचे काम निलेश नाक्ती यांनी प्रामुख्याने केले. निलेश नाक्ती हे श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील रहिवासी आहेत त्यांना या मिळालेल्या पुरस्कारासाठी अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.