Type Here to Get Search Results !

• म्हसळा ग्रामीण रुग्णालय सहाय्यक अधिक्षकास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले● म्हसळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई


• म्हसळा ग्रामीण रुग्णालय सहाय्यक अधिक्षकास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

● म्हसळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधिक्षक विष्णू यशवंतराव सांभारे यांना तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांनी रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. 
 याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार आणि त्यांचे भाऊ यांच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १०/०३/२०२२ रोजी पडताळणी केली असता लोकसेवक विष्णू सांभारे यांनी तक्रारदार यांच्याकडे २०००/- (दोन हजार रुपये) लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर लाप्रवी, रायगड यांनी सापळ्याचे आयोजन करून विष्णू यशवंतराव संभारे (सहायक अधीक्षक ग्रामीण रुग्णालय म्हसळा) जिल्हा रायगड यांना तक्रारदार यांच्याकडून १०००/- (एक हजार) रुपयांचे लाचेची रक्कम ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथील त्यांचे कार्यालयात स्वीकारताना दिनांक ११/०३/२०२२ रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती श्रीमती सुषमा सोनावणे (पोलीस उप अधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो रायगड, अलिबाग) यांनी दिली आहे.
    सदर लाचेची सापळा कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले तसेच अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, लाप्रवी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक श्रीमती सुषमा सोनावणे, पोहवा अरुण करकरे, पोहवा महेश पाटील, पोहवा विनोद जाधव, पोशि सचिन पाटकर, चासपोउपनि घरत यांनी यशस्वीरित्या सापळा कारवाई केलेली आहे. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे या धडक कारवाईने तालुक्यातील इतर शासकीय कार्यालायतील कर्मचारी वर्गाचे धाबे दणाणले असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test