• फळांचा राजा यंदा महागणार
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
बदलत्या हवामानाचा फटका हा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसतांना दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे धुळीचे वादळ, अवकाळी पाऊस, तसेच दमट वातावरण यामुळे चांगले आलेले उत्पन्न कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
आंबा हा फळांचा राजा आहे ज्याची मागणी हे मोठ्या प्रमाणावर होत असते कोकण येथे मोठ्या प्रमाणावर ही बागायती शेती केली जाते. वेगवेगळ्या जातीच्या आंब्याचे उत्पादन घेतले जाते.
आंबा उत्पादनासाठी लागणाऱ्या वातावरणाची कमतरता आहे यामुळे झाडाला आलेला मोहर व कैऱ्या वातावरण बदलामुळे गळून पडत आहेत यामुळे उत्पादन फार कमी प्रमाणात होताना दिसत आहे या नैसर्गिक बदलामुळे होणारे नुकसान यामुळे बागायतदार शेतकरी चिंतेत दिसत आहे. यामुळे आंबा महागण्याची शक्यता आहे.