भाएसोच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
भारतीय एज्युकेशन सोसायटीचे एस.एस.ओ.एस.पी डिप्लोमा कॉलेज हे नेहमीच येथील विद्यार्थ्यांना नवनवीन शिकण्याच्या सुवर्ण संधी निर्माण करत असते. याच पार्श्वभूमीवर डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमधील मेकॕनिकल व संगणक विभागातील विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथील अंबड औद्योगिक क्षेत्रातील मे. शलाका शाफ्ट प्रा.लि. आणि मे. सुमागो इन्फोटेक प्रा.लि. या कंपन्यांत औद्योगिक भेट नुकतीच कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी मेकॕनिकल विभागाच्या तब्बल ५४ विद्यार्थ्यांनी तसेच संगणक विभागाच्या ५० विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीचा फायदा घेतला. या औद्योगिक भेटीदरम्यान मेकॕनिकल विभागाचे प्रमुख प्रा.सुजित पाटील,संगणक विभागाचे प्रमुख प्रा.अस्मिता पाटील यांच्यासह प्रा.विशाल पाटील, प्रा.आश्लेषा शिंदे, प्रा.निशा जामकर, प्रा.शामल शिंगणकर, लॕब असिस्टंट आशिष वाळंज हे विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते. या औद्योगिक भेटीसाठी संस्थेचे संस्थापक किशोर जैन,सीईओ कार्तिक जैन व डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य प्रविण भारती यांनी विशेष सहकार्य केले.
या औद्योगिक भेटीदरम्यान मे.शलाका शाफ्ट प्रा.लि.कंपनीचे सीईओ शलैश पंडित यांनी मेकॕनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तर कंपनीचे उत्पादन प्रमुख इंजिनियर संजय तांडेलकर यांनी कंपनीच्या उत्पादन विषयी इत्यंभूत माहिती दिली. याचबरोबर सुमागो इन्फोटेक प्रा.लि. कंपनीच्या सीईओ सोनाली गोराडे व सुधीर गोराडे यांच्यासह एचआर विभागाच्या मिताली ढोंमणे, प्रसाद पवार,दिप्ती पवार यांनी संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने वर्तमानातील नोकरीतील कल आणि संभाव्य नोकरीच्या संधी यावर अनमोल मार्गदर्शन केले.दरम्यान या औद्योगिक भेटीच्या अनुषंगाने लवकरच भाएसोच्या एस.एस.ओ.एस.पी डिप्लोमा कॉलेज व सुमागो इन्फोटेक प्रा.लि.यांच्यामध्ये करार होणार आहे. याचा फायदा संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांना भविष्यात होईल अशी माहिती प्रा. निशा जामकर यांनी दिली.