• होलिकोत्सवातील हुताशनीच्या ज्योतीने उजळले पोलादपूर ; पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचा होलिकोत्सव साजरा ; पोलादपूरचे ग्रामदैवत सहाणेवर विराजमान
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
शिमगोत्सव हा सण कोकणात मोठ्या धामधुमीत साजला केला जातो या उत्सवाच्या वेळी कोकणातील रिकामी झालेली गावे भरून जातात होलिका उत्सवासाठी नोकरी-धंद्यासाठी परगावी गेलेले चाकरमानी आपल्या गावात सहकुटुंब आलेले आहेत. कोकणातील शिमगोत्सव गावोगावी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मानकरऱ्यांना मान दिला जातो, धुळवड साजरी केली जाते, गावदेवीचा पालख्या होळीच्या सहानेवर बसविल्या जातात.कोकणात प्रसिद्ध असलेल्या पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचा होलीकोउत्सवासाठी सर्व अखंड गाव एकत्र येऊन परंपरेप्रमाणे ठरलेल्या वेळेवर विधिवत होम भक्तिभावाने लावन्यात आला.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून सर्व सण रद्द झाले मात्र या वर्षी नियमांच्या शिथीलतेमुळे समस्त पोलादपूरकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ महाराजांचा होलिकाउत्सव सहाणेवर मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.गुरुवारी होळीच्या दिवशी सायंकाळी श्री काळभैरवनाथ महाराजांच्या पालखीचे सहानेवर खलुबाजाच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले. यावेळी पालखीच्या स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते पालखीच्या समवेत देवाची काठीचे देखील आगमन झाले. यावेळी खालुबाजाच्या ठेक्यावर सहाणेवर काठी नाचविण्यात अली.रात्री प्रत्येक नगरातून पडीक जीर्ण झालेला लाकूड-फाटा मोठ्या प्रमाणावर जमावला गेला व रात्री बाराच्या नंतर होम लावण्यात आला. होम लागते समय हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती लावली होती.होमची तयारी करत असताना एक बाजूला सासन काटी नाचवण्याची व शिकणारे मशगुल होते.छोटे-मोठे गोटे उचलून शक्ती व युक्तीचा खेळ देखील यावेळी खेळला गेला. होळीच्या दिवसापासून रंगपंचमी पर्यंत रोज पारंपरिक पद्धतीने सहाणेवर शहरातील नगरा प्रमाणे जागर कार्यक्रम केले जाणार असून पुढील तीन दिवस पालखी सहाणेवर विराजमान असणार आहे.यावेळी भक्तीभावात होलिकोत्सव साजरा करण्यात आल्यावर होलिकोत्सवातील हुताशनीच्या ज्योतीने संपूर्ण पोलादपूर शहर उजळले