माझी वसुंधरा अभियानांतर्गत पोलादपूर नगरपंचायतीच्या वतीने कागदी पिशव्यांचे वाटप
रायगड वेध देवेंद्र दरेकर पोलादपूर
मागील काही महिन्यांपासून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पुन्हा वाढत असलेला पाहायला मिळत असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वच स्तरावर जनजागृती केली जात आहे.
याच अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ 'माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत' पोलादपूर नगरपंचायतीच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त पोलादपूर शहरामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करत नगरपंचायतीच्या वतीने शहरातील नागरिकांना व दुकानदारांना कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीचा नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरसेवक अस्मिता पवार, स्नेहा मेहता, सुनीता पार्टे, विनायक दीक्षित, सुरेश पवार,नगरपंचायत शासकीय अधिकारी सरंबळे आदी उपस्थित होते