• कोकणात धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
कोकणात उत्साहाने व पारंपारिक पद्धतीने साजरा होणारा सण म्हणजे शिमगा यासाठी लोक फार उत्साही असतात या सणासाठी चाकरमाने मोठ्या प्रमाणात गावाकडे येतात व या उत्साहात सहभागी होऊन त्याला आणखीन महत्त्व प्राप्त होते पाच दिवसाच्या या उत्सवात लोकांना भक्ती भावाने एकत्र येऊन साजरा करतात गावोगावी लोक ग्रामदेवतेची पालखी सहाणेवर आणल्या जातात पारंपारिक होम लावण्यात येतो तसेच काठ्या नाचवत येतात पालख्या सजवून सहाणेवर दर्शनासाठी आणल्या जातात.
कोरोना काळात लोकांनी साध्या पद्धतीने सण साजरा केला होता पण आता परिस्थिती काहीशी नीट झाली आहे नियमांमध्ये शिथिलता आली आहे.
शुक्रवारी धूलिवंदन साजरा करण्यात आला लोकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा केला व कमीत कमी पाण्याचा वापर करून धूलिवंदन साजरा करण्यात आला