साने गुरुजी विद्यालय लोहारे येथे मुलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
कोरोनाचा प्रादुर्भावकाही प्रमाणात कमी झाला आहे शाळा, महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यात आले मुलांना कोरोना ची लागण होऊ नये यासाठी शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक २५ मार्च रोजी साने गुरुजी विद्यालय लोहारे येथे १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस देण्यात आली मुलांना कॉर्बेव्हॅक्स ही लस देण्यात आली यामुळे या वयोगटातील मुलांना कोरोना विषाणू पासून होणारा धोका काही प्रमाणात कमी होईल तसेच पालकांना वाटणारी चिंता ही काही प्रमाणात कमी होईल.
सर्व मुलांनी लसीकरण मोहीम मध्ये सहभाग घेतला. तसेच पलचील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथून आलेले डॉक्टर व सहाय्यककर्मचारी यांचे शाळेकडून आभार व्यक्त करण्यात आले.
राज्यातील काही शाळा-महाविद्यालय यांनी लसीकरण मोहीम राबविली आहे तसेच काही उर्वरित शाळा महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळेत महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबवावी तसेच काही शाळेत महाविद्यालयांमध्ये काही विद्यार्थ्यांचा दुसरा डोस झालेला नाही अशा विद्यार्थ्यांनी व पालकांनी पुढाकार घेऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा जेणेकरून कोरोना विषाणूला आळा घालण्यास मदत होईल व मुलांना चिंतामुक्त व आनंददायी वातावरणामध्ये शिक्षण घेता येईल.