• दांडगुरी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध - आमदार अनिकेत भाई तटकरे
रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी
श्रीवर्धन तालुक्यातील मद्यवर्ती असलेला ठिकाण अर्थातच दांडगुरी गेले कित्येक वर्ष एक निष्ठेने असलेला शिवसेनेचा गाव अशी ओळख असणाऱ्या गावाने विकासकामांबाबतीत खासदार सुनीलजी तटकरे यांच्या कार्यप्रणाली वर खुश होत अखंड दांडगुरी गावांनी आमदार अनिकेत अनिकेत भाई तटकरे याच्या नेतृत्वखाली दि. २० मार्च रोजी गावकऱ्यांनी शिवसेनेचा धनुषबाण खाली ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ हाती बाधला या वेळी व्यासपीठावर आमदार अनिकेत भाई तटकरे, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे उप अध्यक्ष अमित खोत, संदेश काते, ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान शिवसेनेचे सरपंच गजानन पाटील, उप सरपंच दत्तात्रय पांढरकामे,मुबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी सावंत,उप अध्यक्ष अरविंदजी गोळे, मुबई मंडळाचे सह सचिव सुबोध सावंत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेलार उप अध्यक्ष जगनाथ पाटील, शंकर पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते किरण मोरे, सीताराम सावंत, सुरेश राणे, जयश्री धांदृत, महिला मंडळ अध्यक्षा वासंती धादृत, सुरेंद्र राणे, धोंडू पवार, सुनिल कदम, सुनिल राणे, चंद्रकांत पवार, व संपूर्ण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर वरून ग्रामस्थांना संबोधित करताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले गावातील विकास कामांच्या साठी आपण मागणी करतात नीच्छितच पालकमंत्री म्हणुन आदीती ताई या भागाचा नेतृत्व करत असल्यामुळे स्वाभाविकच सगळ्यांची अपेक्षा राहणार की आपल्या असलेल्या आमदाराने आपली विकासकामे करावे परंतु ज्यावेळेस अदिती ताई जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ग्रामदेवी सावराई देवीच्या पूजेच्या दरम्याने या ठिकाणी आलेली होती त्यावेळेस शब्द दिला होता की आपल्या मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्ण करेन तो आज पहिला टप्पा का होईना पंचवीस लक्ष रुपये या रस्त्यासाठी निधि उपलब्ध करून दिला आहे.
ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी पक्षाच्या सहकाऱ्यांचा उत्साहसह तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी एका विशिष्ट झेंड्याखाली काम करता त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या माध्यमातून झालेली काम हे प्रकर्षाने आपल्याला जाणवत असल्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीमागे होतात मात्र बदलेल्या एकंदरीत परिस्थितीमध्ये आपण सुद्धा राष्ट्रवादी पक्षांमध्ये येण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे या मुळे मिळालेल्या सत्तेचा वापर योग्य ते माझ्या लोकांपर्यंत मी मतदार संघात करू शकले तर निश्चितच अदिती ताईने तिच्या परीने प्रयत्न त्यांनी केले त्यामुळेच आज तो मंदिराकडे जाणारा रस्ता आज त्या ठिकाणी होऊ शकला मला वाटतं आपली ग्रामदैवत सावराई मातेचा आशीर्वाद कुठेतरी ताई च्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे म्हणूनच काम पूर्ण करू शकली आज गावात जाणार रस्त्याचा भूमिपूजन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला तेव्हा स्वाभाविकच तिथेसुद्धा आशीर्वाद आज आमच्या पाठीमागे त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात त्यामुळे १५ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पक्षामध्ये प्रवेश आपण सर्वजण करत आहात याच्यासारखा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठला असू शकत नाही. आपण सुद्धा त्याच उत्साहाने आनंदाने आमचं स्वागत केलं त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा मी आपले आभार मानतो पण ज्या अपेक्षेने ज्या विश्वासाने तुम्ही राष्ट्रवादी पक्षाकडे या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याला तडा न जाऊ देण्याची खबरदारी खासदार तटकरे साहेबांच्या वतीने पालकमंत्री आणि त्यांच्या वतीने मी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी माझ्या मुंबईकर मंडळी ग्रामस्थ मंडळ असेल माझ्या माता-भगिनी असतील सर्वांना त्या ठिकाणी देतो आज येत असताना अंतर्गत रस्त्याचे सात लाख रुपयांचा निधी त्याचा शुभारंभ आपण त्या ठिकाणी केला.
ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे गावाचे भौगोलिक विस्तार पाहता गावातील सर्वच घरांपर्यंत किंवा वाड्यात वस्तीपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल अंतर्गत रस्ते त्याचे व्यवस्थित रित्या करायचे असेल तर जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता अंतर आपल्या तिकडे होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्वरितच कार्यकारी अभियंताना सागुन या ठिकाणी असलेले जूनियर इंजीनियर असतील त्यांना या ठिकाणी येऊन अंतर्गत रस्त्याचे मोजमाप घेऊन त्याचे इस्टिमेट करून लवकरात लवकर अंतर्गत सुध्दा रस्ते केले जातील आसे आश्वासन आमदार अनिकेत तटकरे यांनी ग्रामस्थांना दिले.