मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
महामार्गाचे काम सुरू असल्याने मार्ग खूप अरुंद आहेत तसेच सर्विस रोड व्यवस्थित नसल्याने वाहनचालकांना मार्गाचा अंदाज येत नाही.
२३ मार्च रोजी पहाटे एका खाजगी गाडीचा अपघात झाला होता वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तसेच मार्गाचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते.
अपघाताला मोठे कारण म्हणजे तेथे कोणत्याही प्रकारचे मार्ग दर्शवणारे फलक नव्हते तसेच काम चालू आहे किंवा खड्डा आहे असेही दर्शवली नव्हते कामगारांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असावा.