Type Here to Get Search Results !

होळी,धुलीवंदन, शिवजयंती उत्सव, रंगपंचमी आदी सण शांततेत साजरे करा -नागोठणे पो. नि. तानाजी नारनवर


होळी,धुलीवंदन, शिवजयंती उत्सव, रंगपंचमी आदी सण शांततेत साजरे करा -नागोठणे पो. नि. तानाजी नारनवर
 

रायगड वेध अनिल पवार रोहा 


होळी,धुलीवंदन, शिवजयंती उत्सव व रंगपंचमी आदी सण तसेेच शिवजयंती निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक खेळीमेळीच्या अशा आनंदी वातावरणात व शांततेत पार पाडत आपल्या सण व उत्सवाचा आनंद लुटा. मात्र हे करीत असताना कायदा हातात घेऊ नका असे आवाहन नागोठणे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी नागरिकांना केले आहे. सोमवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आगामी येणा-या सणा निमित्त नागोठणे पोलीस ठाण्यात येथे शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती सदस्य यांची संयुक्त बैठक संपन्न झाली त्यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना पो. नि. नारनवर बोलत होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, पो. हा. विनोद पाटील, कोंडगाव माजी सरपंच कृष्णाजी धामणे, रोहा पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हात्रे, नागोठणे ग्रा. सदस्य अतुल काळे, चेतन कामथे, सगिर अधिकारी, अशपाक पानसरे,असिफ मुल्ला, बाळू रटाटे, प्रकाश मेस्त्री, मुजफ्फर कडवेकर, हुसेन पठाण, बाबा मुल्ला, हिराचंद बोंडेकर, कैलास गोरे, राजू नाकते, पंकज कामथे आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते . 
 पो. नि. तानाजी नारनवर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, होळीच्या सणाला पूर्ण झाडांची तोड न करता फांद्याचा किंवा जास्तीत जास्त पडीक लाकडाचा वापर करा, तसेच कुठुनही लाकूड चोरी करू नका. पर्यावरणाचा र्हास करू नका. धूलिवंदन व रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपवय टाळा तसेच अनोळखी व्यक्तीवर रंग उधळू नका. प्रार्थना स्थळांवर रंग उडणार नाही याची काळजी घ्या. जर चुकून रंग उडाला तर दुर्लक्ष करा असे सांगून शिवजयंती उत्सव मिरवणूक शांततेत काढा तसेच सणासुदीच्या काळात तसेच मिरवणुकी दरम्यान भांडण तंटा झाल्यास आमच्याकडे या आपण सामंजस्याने भांडण तंटा सोडवू तसेच कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही त्यामुळे निर्धास्तपणे नागरिकांनी पोलिस ठाण्यात यावे असे आवाहन शेवटी पो. नि. तानाजी नारनवर यांनी उपस्थितांना केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test