फिट इंडिया मिशन साठी १८ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
आरोग्याची काळजी करणे फार आवश्यक असते यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मिशनची सुरुवात केली या अंतर्गत त्यांनी लोकांना आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे ते सांगितले याचा आदर्श घेऊन राजकुमार रजवाडे यांनी लोकांना या मोहिमेचे महत्त्व समजण्यासाठी तब्बल १८ हजार किलोमीटर सायकल प्रवास करून लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी या हेतूने यांनी ह्या प्रवासाला सुरुवात केली १२ मार्च रोजी सुरजपुर छत्तीसगड मधून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली वेगवेगळ्या राज्यांमधून सायकलने प्रवास करून गावोगावी जाऊन योगा, सायकलिंग, अशा शारीरिक व्यायामाचे महत्त्व सांगत आहे या आधीही त्यांनी कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती केली होती तेव्हा १३०० किलोमीटरचा सायकल प्रवास केला होता फिट इंडिया मिशन हे लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी १७ राज्यातून प्रवास करत आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत दिल्लीला पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या गोष्टीचा आदर्श घेऊन आपणही आपल्या आरोग्याची शक्य होईल तसे आपण काळजी घेऊ योगा, जिम्, सायकलींग अशा माध्यमातून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.