Type Here to Get Search Results !

• श्रीवर्धन मध्ये शिवसेना पक्षाला मोठा खिंडार मोठे मासे लागले राष्ट्रवादीच्या गळाला तालुक्यात होणार राजकीय स्फोट• उपतालुकप्रमुख सुकुमार तोंडलेकर यांचा आज राष्ट्रवादी प्रवेश


• श्रीवर्धन मध्ये शिवसेना पक्षाला मोठा खिंडार मोठे मासे लागले राष्ट्रवादीच्या गळाला तालुक्यात होणार राजकीय स्फोट


• उपतालुकप्रमुख सुकुमार तोंडलेकर यांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश 



रायगड वेध श्रीकांत शेलार दांडगुरी
 

 शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सुकुमार तोंडलेकर व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर यांनी सेनेच्या पदाचा राजीनामा देत आज खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. काल शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. अनेक वेळा शिवसेनेच्या आमदार, मंत्री व पक्षश्रेष्ठींनी तळागाळातील कार्यकर्त्यांची दखल न घेतल्याने श्रीवर्धन मतदारसंघातील दिघी गणातील पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. 

जिल्हा परिषदेच्या सदस्या सेनेची असूनही जिल्हा नियोजन मंडळकडून त्यांना कोणताही निधी श्रीवर्धन तालुक्यातील विकास कामांसाठी दिला जात नाही. याशिवाय शिवसेनेकडून विशेष कोणतीही कामे होत नसल्याने शिवसैनिक नाराज होते. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रायगड मधील आमदार मनोहर भोईर, भरत गोगावले, महेंद्र दळवी यांच्या जिल्हाप्रमुख या सर्वांना याबाबत भेटून सांगण्यात आले. सेनेच्या वरिष्ठांकडूनच साठी शिवसैनिकांची दखल घेतली जात नाही असा आरोप यावेळी सुकुमार तोंडलेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते पुढे म्हणाले की बाळासाहेबांची विचार घेऊन मी तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडून ठेवणारा माणूस आहे. ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिले जाते मात्र निधी अभावी त्या पूर्ण करता येत नाही अशी खंत बोलून दाखवली. श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी व खासदार सुनील तटकरेंशिवाय पर्याय नाही. अनेक कामे त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे. यापुढे देखील अशी विकासकामे याशिवाय रोजगार हे राष्ट्रवादी पक्षमार्फत होऊ शकतील या विश्वासाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. शिवसेना कुणीही संपवू शकत नाही मात्र दुर्दैवाने पक्षनेतृत्व शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करत नाही. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही त्यामुळे माझ्यासह माझे चाहते व शिवसैनिक राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश करत आहोत असेही तोंडलेकर यांनी बोलून दाखवले. 
यावेळी पत्रकार परिषदेत श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महमद मेमन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, दिवेआगर सरपंच उदय बापट, हरेश्वर ग्रामपंचायत सरपंच अमित खोत, मंदार तोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test