Type Here to Get Search Results !

घरासमोरील सारवलेली अंगण हे कोकणातील गावांचे वैभव आहे ते टिकवून ठेवले पाहिजे - पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन


घरासमोरील सारवलेली अंगण हे कोकणातील गावांचे वैभव आहे ते टिकवून ठेवले पाहिजे - पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


    म्हसळा तालुक्यातील गणेशनगर गावचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिराचे उदघाटन माघी गणेशोत्सवाचे शुभ मुहूर्तावर पालकमंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी गणेश नगर गावाची रचनात्मक मांडणी, तेथील निसर्ग सौंदर्य, गणेश मंदिर आणि ग्रामस्थांची एकता पहाता घरासमोरील सारवलेले अंगण हे कोकणातील गावांचे वैभव आहे ते टिकवुन ठेवले पाहिजे असे मनोगत व्यक्त करताना सांगितले. 
यावेळी अधिकपणे सांगताना खासदार सुनिल तटकरे साहेबांच्या कार्यप्रणालीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास प्रणालीवर जनतेने ठेवलेला विश्वासाला या पुढेही तडा जावु न देता आपण एका परिवारतील आहोत या भावनेतून काम करत राहु. गणेशनगर गावाला विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही असे आश्वाशीत केले. ग्रामस्थांनी भव्यदिव्य गणेश मंदिर उभारणी करण्यासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. जसे देखणे मंदिर उभारले आहे तशीच सुंदर आणि सुबक गणेश मूर्ती पंढरपूर येथुन आणुन तिची प्राणप्रतिष्ठा करून या मंदिर जीर्णोद्धाराचे उदघाटन करण्याचे भाग्य आपणास लाभले याचा मनस्वी आंनद झाला असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आवर्जून सांगितले. गणेश नगरातील मुंबईकर मंडळीने गावाची नाळ जोडून ठेवत गावाप्रती असलेली आपुलकी व प्रेम कायमस्वरूपी जोपासून ठेवणे गरजेचे असल्याचे सांगताना गावाचे अधिक विकासासाठी ग्रामस्थांनी विविध निवेदन दिले असता टप्प्या टप्प्याने विकास निधी उपलब्ध करू असे आश्वासित केले.
गणेश मंदिर उदघाटन कार्यक्रमाला पालकमंत्री आदिती तटकरे यांचे समवेत जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, माजी सभापती महादेव पाटील, नायब तहसीलदार के.टी.भिंगारे, बांधकाम अभियंता मोरे, महिला अध्यक्ष रेश्मा कानसे, सरपंच अनंत कांबळे, शाहिद उकये, रियाज फकिह,भालचंद्र गाणेकर, लहूशेट म्हात्रे, सरपंच अनंत कांबळे, सरपंच वनिता खोत, सरपंच निलेश मांदाडकर, प्रकाश गाणेकर, जलाल जहांगीर, शेखर खोत, गाव अध्यक्ष, मुंबई मंडळ अध्यक्ष, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांसह ग्रामस्थ मंडळ गणेशनगर व मुंबई, सावित्री महिला मंडळ, तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हसळा तालुक्यातील गणेशनगर गावचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिराचे उदघाटन करताना पालकमंत्री आदिती तटकरे व मान्यवर पदाधिकारी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test