• शिवसेना तालुका प्रमुखांकडून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न- महागाव सरपंच सुषमा कसबले
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
शिवसेना तालुका प्रमुख प्रदूम्न ठसाळ यांच्याकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुषमा कसबले यांनी केला आहे.तालुका प्रमुख प्रदूम्न ठसाळ यांनी बारपे येथील विहिरीचे काम आरसीसी असताना जुन्या कामावर दुरुस्ती करून पैसे लाटण्याचे काम सुरू आहे. तसेच महागाव ग्रामपंचायत ईमारत बांधणीचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे परंतु इमारतीचा जोता जुनाच ठेवण्यात आलेला आहे.अनेक कामे मंजूर करायची त्याचे पैसे काढायचे पुन्हा त्याच कामांना दुसरा निधी मंजूर करायचा असे अनेक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर केले आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना सरपंच सुषमा कसबले यांनी सांगितले की बारपे येथील विहिरीचे बांधकाम प्लॅन इस्टिमेंट नुसार व बांधकामाचा दर्जा राखून गेल्याच वर्षी पूर्ण झालेले आहे.तसेच ग्रुप ग्रामपंचायत महागावच्या कार्यालयाच्या कामाला अजून सुरुवात सुद्धा झालेली नाही. जुनी ईमारत जागेवर आहे त्याच स्थितीत आहे.केवल उतावळेपणा करून ह्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे अशी चुकीची बातमी पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सेनेच्या तालुका प्रमुखांकडून केला जात आहे.खा.सुनिल तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून तळा तालुक्यात विकासकामांचा सुरू असलेला झंझावात या हित शत्रूंना खुपत असल्यामुळे त्यांच्याकडून अशी निरर्थक व बेजबाबदार वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.हे कदापी खपवून घेतले जाणार नाही.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर उडवलेले शिंतोडे निरर्थक व बेजबाबदारीचे असून रिकामटेकड्या व्यक्तींकडून केवल प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशी स्टंटबाजी केली जात आहे.यापुढे जर का कोणतीही खातरजमा न करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येणार येईल असा इशाराही सरपंच सुषमा कसबले यांनी सेनेच्या तालुका प्रमुखांना दिला आहे.
Casino - Dr.md
ReplyDeleteCasino is a social, 군산 출장마사지 non-profit, online-only 김포 출장마사지 website that serves all needs in one 정읍 출장마사지 place. 보령 출장샵 Casino gaming is 안동 출장마사지 one of the largest casino sites in the world.