• श्रीवर्धन मतदार संघाच्या समुद्र किनारपट्टीवर राजकीय हाय-टाईड, उद्या तीव्र राजकीय सुनामी लाट
रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर
महाराष्ट्रात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस पक्षांचे आघाडी सरकार असतांना.आणि शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना तसेच जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था,जि.प.निवडणुकिंच्या ऐंन उंबरठ्यावर येऊन ठेपल्या असतांना.तालुक्यातुन आणि दिघी जि.प.गणातून सुचविलेली विकास कामं होत नाहीत.नियोजन मंडळा कडे आलेल्या निधीचा वाटा मिळत नाही.या सारखं दुर्दैव नाही.या जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचा निधी वाटपाच्या बाबतीत व्यथा पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे मांडल्या असतांना देखील वेळोवेळी दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टीकरण आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जड अंतकरणाने आपले मत मांडले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन मतदार संघाचे अध्यक्ष महम्मद मेमन, बोर्ली पंचतन ग्रामपंचायत माजी सदस्य मंदार तोडणकर, दिवेआगर ग्रामपंचायत सरपंच उदय बापट, हरिहरेश्वर ग्रामपंचायत सरपंच अमित खोत उपस्थित होते. पदाधिकारी, शिवसैनिक यांच्या नाराजीच्या कारणाने श्रीवर्धन मतदार संघातील समुद्र किनारपट्टी वर बोर्ली जि.प.गटात राजकीय हाय-टाईड येणार असून.तीव्र राजकीय सुनामी लाट धडकणार
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन गटातील जिल्हा परिषद दिघी गणात गेले दिड दोन महिने उलट सुलट राजकीय चर्च्याना उधाण आलं होतं.
बोर्ली-पंचतन गटातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांची नुकत्याच काही दिवसांपूर्वी बोर्ली-पंचतन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झाली असता त्या सभेत नियोजित विकास आराखड्यातुन न झालेल्या कामां बद्दलच्या व्यथा व्यक्त केल्या होत्या.श्रीवर्धन शिवसेना उप-तालुका प्रमुख व श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती सुकुमार तोंडलेकर उल्लेखलेल्या व्यथांमुळे उपस्थितांनी सामुदायिक राजीनामे देणाचा निर्णय घेतला होता असे असतांनाही कोणीही साधा संपर्क देखील साधला नाही.
ज्यांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक लढविली नाही.वयाच्या १५ व्या वर्षाचा असतांना ते आज पर्यंत कुठल्याही अपेक्षांची आशा न बाळगता शिवसेना पक्ष वाढविण्या काम केलं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार आणि प्रभावी व्यक्तिमत्व व्यक्तीमत्वांवर नित्तांत श्रध्दा असणारे सुकुमार तोंडलेकर यांच्या कडे सुरवातीच्या काळात पक्षाचं साधं कोणतंही पद नव्हतं अशा वेळी हॉस्पिटल,पोलीस स्टेशन, रात्री अपरात्री सर्वांच्या सुख दुःखात धावणारा,अडी अडचणीतून, अपघात, मारामारी, भांडण तंट्यातून योग्य मार्ग काढुन सामंज्याची भूमिका बजाविणारा, अडले-नडलेल्यांना मदत करणारा, कबड्डी, क्रिकेट स्पर्धा असोत, जिर्णोद्वार असोत कधीही कुठेही मागे नाही.अशा विविध अंगी असलेल्या कर्तृत्ववान गुणांमुळे,शांत,सय्यमी विशेषतः उत्तम संघटन कौशल्यामुळे हा शिवसेनेचा वाघ सन २००७ श्रीवर्धन पंचायत समिती करीता निवडून आले आणि आणि अडीच वर्षानंतर सभापती पदावर विराजमान झाले.सन २०१२ मध्ये जि. पतिषदेची निवडणूक त्यांनी लढवली त्या निबडणुकीत त्यांचा पराभव झाला.आणि २०१७ साली आरक्षणामुळे त्यांच्या पत्नी सौ.सायली तोंडलेकर याच जि.प.गटातून त्या निवडून आल्या.दिघी ते शेखाडी या बोर्ली-पंचतन गटाच्या कार्यक्षेत्रात मतदारांना दिलेले शब्ध केवळ या कारणाने उद्देश असतांना पूर्ण करू शकलो नाही.जिल्हा नियोजन मंडळाचा निधी मिळत नाही याची खंत पक्ष प्रमुख आदरणीय उध्दव ठाकरे सोडून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रत्यक्ष भेटून सांगितलं असतांनाही या कडे दुर्लक्ष केलं जात होतं म्हणून आम्ही शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीवर्धन मतदार संघ म्हणजे एके काळी शिवसेनेचा बालेकिल्ला पण २००९ साली आलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नावाने आलेल्या राजकीय झंजावातात ढासळला.हळू हळू बुरुजही ढासळू लागले ही चिंतेची बाब आहे.पक्ष श्रेष्ठीवर नाराज असल्याने असंख्य पदाधिकारी,कार्यकर्त्यांना घेऊन हा शिवसेनेचा वाघ शिवबंधन सोडून राष्ट्रवादीचा घडयाळ हातात का बांधतोय हे रायगड जिल्हा शिवसेनेने चिंतन करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.