• म्हसळा नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
● नगराध्यक्ष पदी असहल कादिरी तर उपनगराध्यक्ष पदी सुनिल शेडगे यांची नियुक्ती
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
आज पार पडलेल्या म्हसळा नगर पंचायत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वार्ड क्रमांक ६ मधून ६५ मतांनी विजयी झालेले असहल असलम कादिरी यांची नगराध्यक्ष तर वार्ड क्रमांक १७ मधून १२९ मतांनी विजयी झालेले सुनिल शेडगे यांची उपनगराध्यक्ष निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद बिनविरोध बहाल करायचे नाही,विरोधाला विरोध म्हणुन काँग्रेस सेना युतीचे 17 पैकी केवळ दोन, दोन सदस्य असताना काँग्रेसचे नगर सेवक डॉ मुविज शेख यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूकीचे वातावरण निर्माण केले होते.बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल कादरी निवडुन आले. हात उंचावुन मतदान प्रकिया पार पडली.
आमदार अनिकेत तटकरे यांचे उपस्थितीत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवड होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल -बाजाच्या गजरात आनंदाने जल्लोष केला या वेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे विशेष अभिनंदन केले.
निवड प्रकियेला मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अलिशेठ कौचाली,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष नाजीम हसवारे,मावळत्या नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका जयश्री कापरे,गटनेते संजय कर्णिक,सभापती छाया म्हात्रे, जि.प.चे.कृषी सभापती बबन मनवे,तालुका अध्यक्ष समीर बनकर, फझल हलदे,नसीर मिठागरे,संतोष(नाना )सावंत,नईम दळवी,सतिश शिगवण, किरण पालांडे,माजी नगराध्यक्षा कविता बोरकर,भाई बोरकर,सुरेश जैन,लक्ष्मण कांबळे,यशवंत पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
● काँग्रेस सेना युतीचा दारुण पराभव ●
राष्ट्रवादी काँग्रेसला सहजपणे अध्यक्ष पद मिळता कामा नये, फुटीची भीती निर्माण करून म्हसळा तालुका काँग्रेस सेना युतीच्या दोन,दोन सदस्यांनी गटबंधन करून प्रभाग क्रमांक 10 मधून निवडुन आलेले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, नगरसेवक डॉ. मुविज शेख यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते पण तसे काहीच न घडता फक्त निवडणूक औपचारिकता पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस सेना युतीचा मनसुबा वेगळा होता पण राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी तो चाणक्यपणे हाणून पाडला असल्याची चर्चा गेली सहा दिवस ऐकायला मिळत आहे.