Type Here to Get Search Results !

स्व.बाळासाहेब ठाकरे बालोद्यानाचे किशोर जैन यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न


स्व.बाळासाहेब ठाकरे बालोद्यानाचे किशोर जैन यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न


रायगड वेध अनिल पवार नागोठणे


नागोठणे ग्रामपंचायतीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त येथील स्व.बाळासाहेब ठाकरे नगरीतील नागोठणे लायन्स क्लबच्या माध्यमातून सुशोभीकरण व नुतनीकरण करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या स्व.बाळासाहेब ठाकरे बालोद्यानाचे उद्घाटन नागोठणे ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक, शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांचे हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच डॉ. मिलींद धात्रक, दानशूर व्यक्तीमत्व चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन,नागोठणे लायन्स वलबचे अध्यक्ष लायन सुजित महागावकर,पंचायत समिती सदस्य बिलाल कुरेशी,उपसरपंच मोहन नागोठणेकर याजबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सदस्या, लायन्स क्लबचे यशवंत चित्रे,विवेक सुभेकर,सुनिल कुथे,दौलत मोदी,सुजाता जवके,विवेक करडे,अनिल गिते यांच्यासह नागरिक उपस्थित होते .
या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना किशोर जैन यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यानात करण्यात आलेल्या नागोठणे लायन्स क्लबच्या या कार्याचे भरभरून कौतुक केले. याचबरोबर लायन्सच्या माध्यमातून बालोद्यानात करण्यात आलेले सुशोभीकरण व नुतनीकरण अतिशय सुंदररित्या केले असून या बालोद्यानाचे संगोपणही लायन्स कडून अशाचप्रकारे योग्य पध्दतीने होईल यात काडीमात्र शंका नाही असा सार्थ विश्वास यावेळी किशोर जैन यांनी व्यक्त केला.तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी व नागोठणेकरांना एक चांगले फिरण्याचे ठिकाण नागोठणे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लायन्सच्या माध्यमातून झालय याबद्दल त्यांच्या वर दाखविलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला आहे.यापुढेही भविष्यात लायन्स क्लबला कोणतेही सहकार्य लागल्यास निसंकोचपणे आम्हाला सांगावे.आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळेच लायन्स क्लब सारख्या सेवाभावी संस्थेला आमचे लायन प्रकाश जैन यांच्या प्रयत्नातून व पुुढाकाराने ही वास्तू लायन्स व्हिजन व हेल्थ सेंटर साठी देण्याचा ठराव करण्यात आला . मी स्वतः लायन असल्याने मला या बद्दल विशेष प्रेम असल्याचे शेेेवटी किशोर जैन यांनी सांगितले. यावेळी लायन्सचे यशवंत चित्रे,दौलत मोदी, अनिल गिते यांचे विशेष कौतुक केले.
या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्ष लायन सुजित महागावकर यांनी सर्वांचे स्वागत केले तर एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी लायन्स क्लबची थोडक्यात माहिती देताना उपस्थित मान्यवरांचे तसेच नागोठणे ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली. स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान उद्घाटन सोहळा यशस्वी होण्यासाठी लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test