Type Here to Get Search Results !

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन, संपूर्ण कलाविश्वावर शोककळा

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन, संपूर्ण कलाविश्वावर शोककळा

टिम रायगड वेध


 भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

लता मंगेशकर यांची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपुर्ण देशावर शोककळा पसरली आहे. १९२९ साली जन्म झालेल्या लतादिदी यांनी १९४२ सालापासून पार्श्वगायनाला सुरुवात केली. त्यांनी गायलेली हजारो गाणी अजरामर झाली आहेत. मेरी आवाज ही मेरी पहचान है हे त्यांचे गित त्यांची ओळख बनले. देशातील सर्व सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत दोन दिवस राष्ट्रीय दुखावटा जाहिर केला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेश प्रकट करत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test