• म्हसळा तहसिल स्तरावर खामगाव मंडळ मुख्यालयी फेरफार आदालतीचे आयोजन
● नागरिकांना सातबारा उतारा व फेरफार उतारे वाटप
● सर्वसामान्य नागरिकांना सुलभ सेवा देण्याचा म्हसळा तहसीलचा उपक्रम
● फेरफार अदालत मधून नागरिकांमध्ये समाधानकारक वातावरण - खामगाव मंडळ अधिकारी सलीम शहा
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
महाराजस्व अभियानांतर्गत रायगड जिल्हयातील म्हसळा तालुकांतर्गत खामगाव मंडळ मुख्यालयी बुधवार, दि.09 फेब्रुवारी 2022 रोजी तहसिलदार स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तहसिल स्तरावर एक महिन्याच्या वर प्रलंबित असलेल्या साध्या व विवादग्रस्त फेरफार यांची संख्यानिश्चित करण्यात आली आहे. त्यानूसार अदालतीच्या दिवशी प्रलंबित फेरफार नोंदीच्या संदर्भात अर्जदार व हरकतदार यांना आवश्यक त्या पुराव्यांसह उपस्थित राहण्याच्या सूचना याअगोदरच देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार सर्व मुदत पुर्ण झालेल्या प्रलंबित फेरफार यामध्ये 11 फेरफ़ार उतारा, 27 सातबारा उतारा मंजूर करून त्यांचे वाटप खामगाव मंडळ मुख्यालयी करण्यात आले.
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या अदालतीसाठी पर्यवेक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे त्यानुसार उपविभागीय अधिकारी अमित शेडगे तसेच म्हसळा तहसीलदार समीर घारे यांच्या आदेशानुसार खामगाव मंडळ अधिकारी सलीम शहा, आंबेत-पाष्टी तलाठी जे.आर.शेळके, तलाठी कोंझरी-पांगलोली-खामगाव - एस.जे.सोरे, तलाठी वावे-भापट - पी.एच.कळंबे, कृषी सहाय्यक गणेश देवरे यांसह लाभार्थी व अन्य नागरिक उपस्थित होते.
तालुक्यातील नागरिकांना मंडळ ठिकाणी किंवा महसुली गावचे ठिकाणीच सातबारा उतारा, फेरफार नोंद उतारा असे महत्वाचे कागदपत्रे सुलभ पद्धतीने मिळावीत आणि नागरिकांचे तालुक्यात येऊन होणारी वेगवेगळ्या प्रकारची अडचण थांबावी हा महत्वाचा उद्देश असून त्याप्रमाणे महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आदेशानुसार व प्रांताधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यात मंडळ मुख्यालयी व गावोगावी फेरफार अदालत व विविध प्रकारचे दाखले वाटप कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानकारक वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
श्री.सलीम शहा
मंडळ अधिकारी - खामगाव
"रायगड जिल्ह्यात महाराजस्व अभियान चांगल्या प्रकारे राबवून सर्वसामान्यांना आवश्यक सेवा वेळेत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून दि.09 फेब्रुवारी रोजी जिल्हयात अनेक ठिकाणी फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती. प्रशासन अशा अदालतीमधून जास्तीत जास्त प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा करणार आहे. आम्ही तालुका स्तरावर याबाबत सूचना दिलेल्या आहेत. या महिनाअखेर मुदत पूर्ण झालेले सर्व फेरफार निकाली काढण्यासाठी नियोजन केले आहे.”
डॉ.महेंद्र कल्याणकर
जिल्हाधिकारी रायगड