Type Here to Get Search Results !

• बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही - उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर• ६ फेब्रुवारी ला जिल्हा परिषद सदस्य सौ सायली तोंडलेकर, सुकुमार तोंडलेकर यांच्यासाहित ८०० कार्यकर्त्यांचा होणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश


• बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही - उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर


• ६ फेब्रुवारी ला जिल्हा परिषद सदस्य सौ सायली तोंडलेकर, सुकुमार तोंडलेकर यांच्यासाहित ८०० कार्यकर्त्यांचा होणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश



रायगड वेध अभय पाटील 


१५ व्या वर्षांपासून शिवसेना संघटना वाढीसाठी काम केलं. पक्षात अनेक पद भूषवली मात्र आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही शिवसेनेचे पदाधिकारी, मंत्रीच सेनेच्या मुळावर उठले असल्यामुळे सेनेच्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत माझ्यासमवेत अनेक शिवसैनिक ,६ फेब्रुवारी ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करीत असल्याची घोषणा माजी सभापती व विद्यमान श्रीवर्धन शिवसेना उप तालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समवेत श्रीवर्धन मतदार संघ अध्यक्ष महंमद मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, अमित खोत, मंदार तोडणकर, उदय बापट आदी मान्यवर उपस्थित होते.
     माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य निवडून आली नियोजन मंडळावर बिनविरोध निवड झाली मात्र जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून मतदार संघाला येणार निधी उपलब्ध होत नव्हता नियोजन मंडळाचं अध्यक्ष पद पालकमंत्री यांच्याकडे असतो समितीवर जिल्ह्यातील आमदार असतात मात्र सेनेचे आमदार आप आपले मतदार संघ शाबूत ठेवण्यात व्यस्त आहेत. याबाबत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे अनेकदा तक्रारी करून देखील मतदार संघाकडे लक्ष दिले जात नाही. मंत्री एकनाथ शिंदे मंत्री अनिल परब यांची देखील भेट घेतली मात्र सेनेचे मंत्री कुठेतरी कमी पडत असून यात मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची काही चूक नाही. मात्र त्यांच्यापर्यंत आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना पोहचू दिल जात नसल्याचा आरोप यावेळी माजी सभापती सुकुमार तोंडलेकर यांनी दिला. माझा नेहमीच मतदार संघात सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न होता. विकास करण्याचं काम केलं मात्र निधी अभावी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. म्हणून मी उपसभापती पदाचा राजीनामा बोर्ली विभागातील सर्व पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामा दिला मात्र पक्षाकडून अद्याप कोणीही विचारपूस देखील केली नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांचा प्रत्येक घराघरात पोचण्याचा मानस व विकासाचा तटकरे साहेबांच्या विचार धारेला प्रेरित होऊन प्रवेश 
करत आहे. पक्ष प्रवेश करताना मला जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्याचं आश्वासन खा. सुनील तटकरे यांनी दिला असल्याचे सुकुमार तोंडलेकर यांनी सांगितलं यावेळी पत्रकारांनी अनंत गीते यांनी विकास काम केली नाहीत त्याबद्दल विचारणा केली असता अनंत गीते साहेब स्वच्छ माणूस आहेत, सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. आताची जनता विकास कामांकडे बघुन मतदान करते त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे सुकुमार तोंडलेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test